Thursday, December 30, 2010

नव वर्षा तुझे स्वागत............



धरेची पुन्हा एक सूर्य परिक्रमा पूर्ण झाली.
आता तुझ्या आगमनाची तिथी ती आली.
जुने साल चालले परतीचा सलाम मागत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

नव वर्ष सर्वास लाभो सुखाचे,
मौज मजा अन हर्ष मुखाचे.
तुझ्या आगमना प्रती जागेल जगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

तरुणाईचा जोशीला जल्लोष फुलेल.
अबालवृद्धात उत्साह तो भरून उरेल.
तुझ्या स्वागता नसेल आनंदा अंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

झाले गेले सारे विसरून जाऊ.
नवी आशेची सुख स्वप्ने ती पाहू.
जीवनात येऊ दे अजुन खास रंगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

या वर्षात सारे शुभ शुभ घडावे.
ऐतिहासीक नोंदीत तुझे महत्व वाढावे.
तुझ्या नावाची राहो किर्ती दिगंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.


© बाळासाहेब तानवडे३०/१२/२०१०


http://hindikavitablt.blogspot.com/



प्रतिसादाची प्रतिक्षा
(Happy New Year)

Friday, December 24, 2010

Secret

निसर्गाचा आकर्षण नियम आता सिद्ध आहे.
इच्छित पैसा ,मनाजोग प्रेम आता सहज साध्य आहे.
हे ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

निसर्गाला तुमचा आदेश कळेल, इप्सित साध्य हमखास मिळेल.
सुखांचा वर्षाव होऊ लागेल, जणू अलाउदिनचा जादुई दिवाच लाभेल.
म्हणून सर्वांचच जीवन ,सुख-समृद्धीने वहाव.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

दु:ख उगाळून दुःखच मिळेल,कल्पित सुखाने सुखच बरसेल.
थोडं मागा प्रचिती मिळेल,विश्वास निसर्ग नियमांवर बसेल.
यासाठी ‘Rhonda Byrne’ चे ‘Secret’ पहाव.नाहीतर मातृभाषेत ‘रहस्य’ वाचावं.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

© बाळासाहेब तानवडे२४/१२/२०१०
http://hindikavitablt.blogspot.com/ 


प्रतिसादाची प्रतिक्षा

Thursday, December 16, 2010

कल



आई म्हणे तू हेच कराव. 
बाबा म्हणती तू हे ध्येय धरावं. 
मला न कळे अस का व्हाव . 
दोन्ही पासून मन दूर दूर पळाव. 

शाळेच्या विषयांत रस नसावा. 
कॉलेज मिळे पाहून गुणांच्या धावा. 
मला न कळे अस का व्हाव . 
शिक्षणाच पर्व असच वाया जाव. 

नोकरी मिळे पाहून पदवी. 
नावडत्या कामाचं स्वरूप पदोपदी रडवी. 
मला न कळे अस का व्हाव . 
नऊ ते पाच मध्ये जीवन धडपडत जावं. 

या सर्वाला का जीवन म्हणावं. 
ज्यात तडजोडीन कसंतरी जीन जगावं. 
म्हणुन स्वत:ची क्षमता आणि कल स्वत:च जाणावा. 
जीवनाच्या प्रत्येक टप्यात फक्त आनंदच मिळवावा.


कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे – १६/१२/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/

(Kal)



Friday, December 10, 2010

रक्ताच नातं

 
रक्ताच नातं बहाल होतं.
सुख दुखात जीवापाड जपलं जात.
पण अचानक असं काय घडतं.
अतूट वाटणाऱ्या नात्यात अंतर पडतं.

कालांतराने त्याच कारणही कळत.
नातं आणि धनात द्वंद्व झालेलं असतं.
नातं आणि स्वार्थाच कंद माजलेल असतं.
दोन्ही लढाईत ,घट्ट नातच हरलेल असतं.

पण वियोगात नात्याची याद छळेल.
भुतकाळ सध्य स्वप्नात भरून उरेल.
अडचणींच्या काळात प्रचीती मिळेल.
रक्ताच्या नात्याची महती कळेल.

दुनियेची ही वेडी रीत सोडून द्यावी.
सत्यासत्यता शांतीन अंतर्यामी पहावी.
धन, स्वार्थाचा फोलपणा कळावा.
नात्याच्या शक्तीचा साक्षात्कार व्हावा.

कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे१०/१२/२०१०

Sunday, December 5, 2010

बकुळा

माझ नाव हाय बकुळा.
माझ्या अंगात नाना कळा.
माझ्या साठी सारा जन खुळा.
पडू नका माज्या तुम्ही गळा.
तुम्ही मुकाट घरला पळा दाजी तुम्ही घरला.

कोरस : पिरतीच पाणी हीच तुम्हा दाजी गोड वाटलं.
राघु मैनेच्या पेरूची ही फोड वाटलं.
हिच्या इष्काचा रंग लई न्यारा दाजी लई न्यारा.  

ती :माझ चमचमतय अंग अंग.
जणू पुनवचा त्यो चांद ग.
वर काचोळी झाली बाई तंग.
पर येयाची न्हाई तुम्हा संग.
तुम्ही मुकाट घरला पळा दाजी तुम्ही घरला.

कोरस : पिरतीच पाणी हीच तुम्हा दाजी गोड वाटलं.
राघु मैनेच्या पेरूची ही फोड वाटलं.
हिच्या इष्काचा रंग लई न्यारा दाजी लई न्यारा.  
शाहीर  : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे  ०५/१२/२०१०
Bakula- Marathi Lavani

रत्न

रत्न
राजाची  अन  राणीची ,
गोष्ट  आहे  नवरत्नांची.
एकजुटीच्या  प्रयत्नांची ,
विलग  होऊन  सलग  होण्याची.

राजाचा    आणि   राणीचा,
संसार  होता  काबाड  कष्टाचा .
सच्चाईच्या  वागण्याचा ,
म्हणून  होता  समाधानाचा.

अथक  कष्टाचे  चीज  झाले.
अंकुरून नासिबाचे  बीज  आले.
नवसा सायासाने  ना  कुणा  मिळे.
तो  नवरत्नांचा  हार  यांना  फळे.

नव  रत्ने  सारी  सुरेख  होती ,
प्रत्येकाची  अलग  चमक  होती.
पण  एकाच  तेज  भारी  होत,
जणू  सर्वांच  राज  कारभारी  होत.

सर्वांची  त्यावर  माया  होती.
त्याची  सर्वावर  गर्द  छाया  होती.
पण  अचानक  गहजब  झाले.
ते  रत्नच  हरातून  अलग  झाले.

आकांड  - तांडव  गोंधळ  झाले.
एकजुटीचे  तुकडे  पडले.
निराशेचे  ढग  साचले.
दुःखाचे  डोंगर  मग  रचले.

प्रयत्नांची  शर्थ  झाली.
बोलणी  सारी  व्यर्थ  झाली.
अखेर  जागा  त्याची  रिती  राहिली.
पण  याद  मात्र  जिती  राहिली.

राणीने  तर  श्वास  सोडला.
राजाचाही  श्वास  कोंडला.
रत्नांचा उल्हास सांडला.
नात्यावरचा विश्वास उडाला.

पण  अचानक  वारे  फिरले.
फिरून  ते  रत्न  माळेत शिरले.
वियोगाचे  दिन  आता  सरले.
प्रत्येक  मन  आनंदाने  भरले.

कवी : बाळासाहेब तानवडे
 © बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०
(Ratn)

मथुरेच्या बाजारी



गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी .
दही  दुधान  भरा  घागरी.
अन   गौळणीनो  जाऊ , मथुरेच्या  बाजारी ,

लवकर  चला,
बाई बिगी  बिगी  चला,
नाहीतर  अडवेल नंदाचा  हरी .
गौळणीनो जाऊ, मथुरेच्या  बाजारी,

अवघड  घाट,
बाई  दूर  यमुनेचा  काठ.
बाई  पकडेल   कान्हाची  स्वारी.
गौळणीनो जाऊ  ,मथुरेच्या  बाजारी.

आला  जवळ  फार,
बाई  मथुरेचा  बाजार.
चला  गाठेल  हरीची  बासरी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी ,

मनास  माझ्या  चैन  पडेना .
कुठे  पाहू  मज  दर्श  घडेना.
ऐकून  माझ्या  हाक  अंतरीची.
ऐकू  दे  तान  तुझ्या  बासरीची.

लवकर  चला,
बाई बिगी  बिगी  चला ,
बाई  मारू  हरी  नामाची  ललकारी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी.

कवी : बाळासाहेब तानवडे  
 © बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०
(Mathura Bazar- Gavlan)