Thursday, December 29, 2011

कळतंय पण वळतंच नाही


अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य. 
होईल जीवनात सार कांही साध्य. 
गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आळसाशी नसाव कदापी मैत्र. 
तयान जीवनाचं बिघडत सूत्र. 
प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

वेळेच महत्व पार पैशांसमान. 
जर पाळलं तयाच व्यवस्थापन. 
करून वेळेत होईल सारच सही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.
मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत. 
मग बुवा अन वैध्यांची फिकीरच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आता वाईट सवयींची गुलामी सोडू, 
अन गांभीर्याशी नित्य नात जोडू.
मग कधी म्हणायची गरजच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २९/१२/२०११ 

Monday, December 5, 2011

Why This kolavery ... Di Marathi Version - Kolhapuri Mard Gadi(कोल्हापुरी मर्द गडी)




मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.
चला वाजवा.
आम्ही कोल्हापूरी .. जगात भारी.

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा. 

रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं.
साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरणं||१|| 

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा. 

पायात चपल कर्रा कर्रा , फेट्याचा झुलतो तुर्रा.
तालमीत जाऊन बैठका मारून,शोभे पैलवान खर्रा||२||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा. 


मित्रानो , तुम्हाला वाटल नुसत्या गप्पा मारतोय....

गप्पा,गप्पा, गप्पा,गप्पा, नाहीत नुसत्या गप्पा.

पटलच आता. 

आमचं बोलणं,चालणं,वागण पाहिलंत.
आता आमचा खाना आणि बाणा कसा तो बघा.

हुं ss तांबडा रस्सा... आमचं खाण बघा... 

तांबडा रस्सा , पांढरा रस्सा वरपतो भुर्र भुर्र.
नाश्त्याला वडा , कट मिसळ आणि चहा फुर्र फुर्र. 

नव नव रोज नव , हॉटेल देतंय चव. 
खाव प्यावं द्यावं घ्याव , होतया मग नाव.

राजा शाहूच आमचं नात , नाही कुणा भीत.
चांगल्याशी चांगल वाईटाशी वाईट, हाय मराठा जात||३||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा. 

कोल्हापुरी .. जगात भारी.


रचना व गायन : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ०६/१२/२०११


Saturday, November 12, 2011

काव्य अक्षता


चि. सौ. कां. प्रियांका 

आणि 

चि. प्रमोद 

यांच्या 

शुभ विवाहा प्रित्यर्थ उधळलेल्या काव्य अक्षता. 

वंदन प्रथम करू या शुभंकर श्रीगणेशाला. 
कृपेन श्रीरामाच्या हा मंगल समय आला. 
श्रीजोतिबा कुलदैवताची सदा लाभली छाया. 
वर्षाव सुखांचा अविरत,सवे सकलांची माया. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||१|| 

आंतरजालचे सहाय खास,जाहले तयांचे प्रथम दर्श. 
प्रियांका वरे प्रमोदास, जाहला सर्वास बहुतही हर्ष. 
आज सोनियाचा दिन आला,उत्साहानं भरून गेला. 
सनईचा सुस्वर घुमला ,चौघडा सवे सुरात रमला. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||२|| 

पपा मोहन शांत सज्जन,ममा शालन मायेच गुंजन. 
केलं फुलापरी संगोपन,अन् दोहोंच सुसंस्कारीत मन. 
राहुलदादा,कर्तुत्व मोठं,स्वप्नावहिनीची खंबीर साथ. 
गोड भाचे रायन,सिद्धांत,लीलांचा काय वर्णावा वृतांत. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||३|| 

लेक लाडकी आज जाईल,सासरला नांदण्या सुखान. 
लोभस स्वभावे जिंकेल सासू,सासरे,नणंद,पतीचे मन. 
निरोप घेता माहेरचा आता, दाटेल कंठ भरेल नयन. 
आठवांची होईल गर्दी तुडुंब,आठवेल पार ते बालपण. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||४|| 

सुहास्य वदना प्रियांका आज,प्रमोदाची “प्रिया” जाहली. 
प्रमोद भरेल जीवनात “मोद” ,बनून सुखाची गर्द सावली. 
उधाण येवो आता आनंदास ,चहुबाजूंनी व्हावा उत्कर्ष. 
संगणकतज्ञ दोहोंस लाभो, “नांदा सौख्यभरे” आशिष. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||५|

रचना आणि स्वर : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ११/११/११ 

Saturday, October 22, 2011

कुणीतरी आहे तिथं.......


अमर्याद आहे ब्रम्हांड न्यारे.
करोडो ग्रह आहेत लाखो तारे.
जीवनाचे विविध पैलू मात्र धरतीवर इथं.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

जस धरतीवर छान वातावरण.
सभोवार पाणी ,प्राणवायू भरून.
जीवनाची असेल तिथं कांही वेगळी रीत.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

वाहतो वारा , जाणवतो वारा.
पण डोळ्यांना ना दिसतो वारा.
परग्रह वासियाचं ही कांहीस असेल तसं 
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

ब्रम्हांडात पृथ्वी जणू छोटासा कण.
जर कणावर निसर्गाच एवढ ध्यान.
उरल्या जगावर निसर्गाची का नसेल प्रीत? 
एवढ मात्र आहे त्रिवार सत्य, कुणीतरी आहे तिथं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २३/१०/२०११

Wednesday, October 12, 2011

स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs -The Apple Man)


धन्य ते माता पिता तयाचे अब्दुलफतेह अन् जोहान.
ऐसे पुत्ररत्न दिधले जगाला,जयाचे कार्य हो खुप महान.

Full जगताच्या Techno savy जनांचे पुरे करण्या सारे ख्वाबस्.
धरती वर अवतरला अलौकिक प्रतिभेचा TecnoCrat Steve jobs.

अविष्कार केले एका मागून एक झाली तुझी रे दिगंत कीर्ती.
करून ‘Apple Inc ची Co-निर्मिती,संवर्धन अन् खुप उन्नती.

तरल कल्पकता अन् दूरदृष्टी तुझी रे,काय ते बुद्धीसामर्थ्य अन् जिद्द.
Technology च्या तुझ्या विशाल Kingdom ला दूरवर नव्हती रे हद्द.

“Apple Inc” च्या प्रगतीचा Index  रे कायम ठेवलास तू Bullish.
तरुणाइस दिलास बहुमोल संदेश “Stay Hungry Stay Foolish”

संगीताच केलस दालन खुल तू, i-tunes अन् i-pod न केली Height.
संगीत प्रेमींच्या गळ्यातला बनलास तू one and only लाडका ताईत.

होता Apple मधून पायउतार तू लढवली ‘NextComputer ची ढाल.
Superhit Animation Films चे ‘Pixar मधून तू पसरलेस मायाजाल.

अखेर “Apple Inc” वाले  आले शरण रे,तुजवाचून त्यांचा खुंटला मार्ग.
 ‘Next सह दाखल झालास पुन्हा तू ,बनून Backbone दाखवण्या स्वर्ग.

जेता असा तू तुजकडे होते , प्रत्येक Hurdle ला योग्य ते Answer.
पण नाही टाळता आला तुला रे , तो दुर्दैवी स्वादुपिंडाचा Cancer.

Gadgets चा राजा तू , जगाला दिलीस Apple ची I-Series i-pod  ते i-pad.
पण अचानक जीवनाच्या Exit ने केलेस,Comman Man ते Obama चे i-Sad.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १३/१०/२०११

Saturday, September 17, 2011

Crush चा फंडा


प्रथम दर्शनीच जणू ShortCircuit होतं,
हृदयात धडधड,उडतो काळजात Spark.
डोक्यातून धावत तळ पायात सरसरतो,
गोडगोड Current चा भिरभिरता Jerk.

जणू Painter ने Canvas वर फिरवावा,
रंगरंगीला , मऊशार , हळुवार Brush.
मन मोर नाचतो छान पिसारा फुलवुन,
अन् तोच तो असतो भिडू Solid Crush.

Crush ला वयाचं बंधन ते कुठंलं?
१२ पासून ६० पर्यंत कुठेही गाठतं.
हुळहुळत्या  मनात Feeling येत हाय हाय.
जणू मनोहारी स्वच्छंद Butterfly  उडतं.

Crush  आणि प्रेमात गल्लत नसावी.
दोघे जरी वेगळे, दोघांचाही नाद खुळा.
प्रेम आयुष्यात एकदा आणि एकाशी.
Crush मात्र कुणावरही,कधीही,कितीही वेळा,

Yongistanच्या फंड्यानची नवलाई प्यारी,Crush.
अनुभवी बंड्यानची नवभरारी न्यारी,Crush.
प्रेमात पडण्या आधीची Grand Rehersal,Crush.
अजून यौवनात मी वाल्यांच Mad Reversal,Crush.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १८/०९/२०११

Saturday, September 3, 2011

श्रीनिवास खळे



अबोल झालं आपलं गीत-संगीत आज.
हरवला जणू त्यांचा प्रिय स्वर- साज.

संगीत साज तुम्ही बहुढंगी थाटला.
भाव भक्तीच्या सुरांनी कळस गाठला.

सुरात रंगला सारा मराठी जनलोक.
सवे दंगला अजुनी अन्य भाषिक.

अभंग तुक्याचे”   स्वर्ग सुरात न्हाले.
शुक्रतारा मंदवारा मना-मनात राहीले.

मधुर सूरांच शीतल चांदणं पसरलं.
बहु गीतास सुंदर कोंदण गवसलं.

सूर संगीताचे आपण फुलवलेत मळे.
लोकमान्य-राजमान्य तुम्ही श्रीनिवास खळे.

राहील सूर संगीत आपले अमर.
सूरांच देण हे कधी न फिटणारं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०३/०९/२०११
खळे काका [Shrinivas Khale]

Monday, August 22, 2011

रेव पार्टी (लावणी)....(Rave Party)


ती: टेनटी फोर सेवन कामाचं आलं बाई फॅड.
जादा पैक्यापाई झाल्यात आता समदीच मॅड.
सीसीडी अन् बरिस्त्यात रंगत्यात गप्पांच फड.
मी म्हणती जाईन पर दाजीबाच अडतंय घोड. 


कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
      लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला.
  पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती :सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला.

पोरा – पोरींच फेसबुक असतंय.
टीवटर आणि आर्कुटबी असतंय.
म्हण तेच्यावर गुलूगुलू करत्यात.
रेव पार्टीला जागी एका जमत्यात.
 धूम धमाल असते मौज मस्तीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला||१||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती :हातामंदी हे हात कीव धरू.
 डोळ्यामंदी हे डोळ कीव भरू.
डान्स धमाल डिस्को करू.
पार्टीमंदी त्या खान-पिणं करू.
नसल हद्द त्या मादक धुंदीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला||२||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

शाहीर : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २२/०८/२०११
Rave Party- Marathi Lavani

Saturday, August 13, 2011

बुलंद आशा



मलाही उंच आकाशात उडायच आहे,
पण पंखात बळ कोठून आणू?

मलाही उंच शिखरं गाठायची आहेत.
पण पायात बळ कोठून आणू?

त्यांना नशिबवान म्हणावं का?
जे आज उंच आकाशात भरार्‍या मारतात.

हो कारण त्यांचा आज चांगला आहे.
पण मी आज का निराश व्हावं?

कारण सगळेच दिवस सारखे नसतात.
उद्या माझ्याही पंखात वीज संचारेल.

माझ्याही पायात सामर्थ्य येईल.
कदाचित उद्या मी आकाशाला गवसणी घालेन.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २०/०६/२०११

(Buland Asha)

Monday, August 1, 2011

माझा गांव


प्रातःकाळीच्या सूर्याची प्रभा दिसे सोनेरी छान.
चारी बाजूनी निसर्गाची , आहे मुक्त उधळण.

धनवान ,गुणीजन गाजे पंचक्रोशीत नाव.
असा सर्वांग सुंदर आहे, देवर्डे माझा गाव.

असा सुजन लाभला गावच्या प्रत्येक आळीत.
स्वच्छ,तंटामुक्त गाव राहील कित्येक पर्वात.

जातपात भेद नाही भाईचारा भरून राही.
मना-मनात ,घरात रामराज्य नांदू पाही.

आहे मेहेरनजर खास, साऱ्या ग्रामदैवतांची.
नाही धन-धान्या तोटा, लयलूट समृद्धीची.

सुखसोई साऱ्या झाल्या वीज,पाणी,वाहतूक.
शिक्षणाचे केंद्र झाले, किती करावे कौतुक.

हिरण्यकेशीचा प्रवाह वाहतसे बारमाही.
शेत शिवार फुलते भात ,ऊस ठाई-ठाई.

चिरा इथला प्रसिध्द दूर गावो-गावी जाई.
भुईमुग ,मेसकाठी, काजू मस्त चलन देई.

म्हाई होई दरसाली रवळनाथ देवाची.
पाहुणे-राउळे जमती,येई आनंदा भरती.

चव्हाटी रंगे होळी घरोघरी पुरण पोळी.
फुलतो गोठण लुटण्या सोनं दसऱ्याच्या वेळी.

विठ्ठलाच्या राउळीं या,सदा वैष्णव भजती.
आषाढी-कार्तिकीची वारी,नाही कधी चुकविती.

गायराना गायी-म्हैशी चरुणी तृप्त होती.
गौळदेव ओढ्यात डुंबती,अंगी भरून मस्ती.

माझे नसीब हो थोर, मज लाभला हा गाव.
उतराई होईन मी, वाढवून कीर्ती, नाव.

माझ्या गावाची प्रगती होवो दिवसागणिक.
सर्व क्षेत्रांत राहो माझ्या, देवर्डेची उतुंग झेप.

 कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०१/०८/२०११
Maza Gaav

Tuesday, July 26, 2011

लेक लाडकी - उत्तरार्ध



लेक माझी लाडकी , भाग्य घेऊन आली.
सुख-दु:खाच्या क्षणात,साथ मला देत गेली.

आई वर जीव भारी,सर्वांची तू मोठी ताई.
काही अडता-नडता , तुज कडे धाव जाई.

तुज नसे कधीही,आळस कोण्या कामाचा.
हसत मुख सदा राही , ठाव नसे घामाचा.

आकाशी या स्थित होते,चंद्र,सूर्य अन् तारे.
पण मला न कळले , कसे फिरले ते वारे.

शब्दा मागून शब्द आले, वाढले दो मुखात.
परिणीती मग झाली, अबोला अन् दु:खात.

धन-दौलत , जमीन-जुमला, ना राही माझा-तुझा.
चार दिसांच्या जीवनी या,का ही अबोलाची सजा?

अखेरचे दिन आता, बघ माझे हे आले.
यमराज काल मला,आमंत्रण देऊन गेले.

आता एकवार तरी, जावस भेट तू देऊन.
राग ,द्वेष ,अभिमान, थोड बाजूस ठेऊन.

यमराजा थोपविले, दिली हजार कारणे.
आता तरी भेट मला,सोड तुझे ते धरणे.

वाट पाहणेची आता ,लेकी पार झाली हद्द.
नेण्या स्वर्गाच्या दिशेने,चित्रगुप्त आले खुद्द.

आता पर्वा ना जनांची, तोंड देईन निंदेस.
पण रोकेन शिवण्या, तो पिंड कावळ्यास.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०७/२०११