Tuesday, January 25, 2011

साजन

स्वप्नी माझ्या मज साजन दिसावा.
खोडी काढून गोड गाली हसावा.
धरेन तयासी मग लटका रुसवा.
जाईन दूर टाकून कटाक्ष फसवा. 

भ्रमरापरी तो येईल मागुन.
लपेन मी फुल अन वेलीं मधुन.
घमघमेल चारी बाजुनी गंध.
हळुच मागुन तो नयन करेल बंद

उगा-उगा झोंबेन सोडवण्या मज.
सर्वांगातून झंकारेल मधुरसा साज.
वाटे मज हृदयाशी घट्ट तयाने धरावे.
ओठांनी अमृताचे प्याले रिते करावे.

तनु तयाच्या सदा विळख्यात रहावी.
अजंठाची ती युगुल मूर्तच भासावी.
क्षणा- क्षणाचे एकेक युग व्हावं.
प्राण प्रियाचं स्वप्न आता सत्यात यावं

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०१/२०११
 (Saajan)

Sunday, January 23, 2011

लेक लाडकी - पूर्वार्ध

नवसाला माझ्या तो देव ग पावला.
तयातच तुझा पोरी जनम ग झाला.

संसार वेलीला माझ्या फुलोरा आला.
घर अंगण सार भरभरून ग गेला.

रांगणार बाळरूप आता बसुही लागल.
हाती जे येई त्यास चोखूही लागल.

कौतुकान दिल तुला मुठीच खेळण.
लाडे लाडे भुईवर घेतलस तु लोळण.

शाळेशी जाण्या मग तु हट्ट जो केला.
पोरीनं शाळेत? जन अचंबित झाला.

मायेन पाटी-पेन्सिल हाती ती दिली.
बघताबघता तु पार एस एस सी झाली.

वरून साजिरा राम जणू त्याची सीता तु झाली.
पाठवणी पित्याचा दाटला कंठ , दु:खी माता तु केली. 

तु संसार केला नेटका ,झाला धन्य माझ्यातील पिता.
भावंडाना लावी जीव ,जणू त्यांची दुसरी तु माता.

सुगरण अन्नपूर्णा तु, तुझ्यात फक्त मायेचाच ठेवा.
गुणसंपन्न लेक तु माझी ,मला वाटे माझाच हेवा.

विशाल हृदय तुझे जणू सागरापरी.
सदा मदतीस हजर ,जणू तु आसमानी परी.

विश्वास नसे बसत ,अस जगी माणूस असतं.
सार्थ अभिमान वाटे , तेही माझ्या लेकीत वसतं.

पण अचानक तुझा समज असा काय झाला.
लेकी तुझा प्रिय बाबा तुला अनोळखी झाला.

दूर दूर गेलीस , आम्हा टाकुनी एकटी.
नाही वळून पाहिलीस मागे भावंडे धाकटी.

आई जणू होती तुझी पारदर्शी काचच ग.
तडकली ती ,पण शेवटी नाही सावरलस ग.
  
दमलो मी ,थकलो मी, झालो शक्तीहीन मी.
नजरेन साथ सोडली, अर्ध्या अंगानच जगतोय मी.

मरणाच्या दारात उभा , जीवनाची भैरवी गातोय मी.
तुला एकवार तरी पहावे ही एकच आशा करतोय मी.

येशील का ग माझ्या शेवटी सरणावर तरी.
फोडून हंबरडा बाबा म्हणून ढाळशील का अश्रू दोन तरी.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Lek Ladaki)

Saturday, January 15, 2011

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला ......



आला संक्रांतीचा सण.
आता शुद्ध करू मन.
जपू तिळगुळ देण्याचा वसा.
करून गोड बोलाची आशा.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Sankrant Greeting)

Friday, January 14, 2011

Internet राजा.......


Internet राजा, तु आला, तुला जगाने पाहीले आणि तु जिंकला.
अविरत सेवांचा ओघ देताना ना रे कधी तु थोडासाही थकला.

पदार्पणातच जगास दिलास तु सुसाट e-mail.
वर्षानुवर्षांच्या पत्रास बनवलेस क्षणात snail mail.

Internet राजा, तु रे आहेस फारच फार great.
जगभरच्या आप्त-मित्रांशी भेट घडवशी थेट.

दिल्यास अनंत chat room तु ,सतत चालती गप्पांचे फड.
कुणी संसार सुखास मुकले ,कुणी प्रेमाचे केले सर गड.

तुझ्या आकर्षणाने झाले सारे जगच रे वेडे.
बनवलेस जग सारे एक global खेडे.

Internet राजा, तुझ “दुधारी तलवार” दुज name.
बऱ्या वाईट प्रवृतीशी वागणं तुझ same.

माहिती ,खेळ आणि मनोरंजन सेवा देशी तु मुफ्त.
पण तुझा दुरुपयोग जे करती, तयासी व्हावस आता तु सक्त.

राजा तुझ्या उद्गात्याला,Vinton Grayला कोटी-कोटी धन्यवाद.
ऋणात राहील जग सारे हे मात्र निर्विवाद.


 कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे१४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

Thursday, January 13, 2011

संक्रांत Greetings


आकाश विविध रंगी पतंगांनी फुलू दे.
आसमंत उत्साहानी इंच – इंच भरू दे.
बाजरीच्या भाजी – भाकरीन जेवण खुलू दे.
एकमेकास तिळगुळ देवून गोड-गोड बोलू दे.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Sankrant Greeting)

Wednesday, January 12, 2011

संक्रांत सदिच्छा


तिकडं सुर्याच मकर संक्रमण चालू.
इकडं बोचऱ्या थंडीचं आक्रमण चालू.
तिळगुळ खाऊन शरीराचा उष्मा चढवू.
गोड-गोड बोलून एकमेकात स्नेह वाढवू.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Sankrant Greeting)

Tuesday, January 11, 2011

संक्रांत भेट (In Advance)


गुलाबी थंडीत परिसर न्हाऊन गेला.
त्यात डौलत संक्रांतीचा सण हा आला.
एकमेकात उबदार स्नेह वाढवू चला.
तिळगुळ घ्या आणि गोड – गोड बोला.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Sankrant Greeting)

Saturday, January 8, 2011

जय हनुमंत


जन्मताच धरेवर उडवलीस दाणादाण.
सूर्य महातेज गिळण्या करीशी तु उडान.
पवन पिता लाभे तुज,तु अंजनीसुत.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

तुझ्या शक्तीची साऱ्या जगी रे ख्याती.
बलवान तुज जैसा कोणी ना जगती.
दर्शने होई तुझ्या शनी पीडेचा अंत.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

सीते सोडवण्या तू लंकेशी गेला.
लंका दहणी प्रताप तुझा रावणे दाखवीला.
पराक्रमे होई तुला गदेची साथ.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

लक्ष्मन मूर्च्छित होता उडान तू केले.
संजीवनी बुटी आणण्या तु पर्वता तोलीले.
तुजसम नसे जगती कोणी रामभक्त.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे०५/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Jai Hanumant)
 




     

Wednesday, January 5, 2011

मी कोण? आपण कोण?


न मागताच मिळे नश्वर तन.
न मागताच मिळे जोडीला चंचलस मन.
न कळे आपल्या असण्याचे काय प्रयोजन?
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

तहान-भूक लागे, शरीर अन्न-पाणी मागे.
सारे शरीर निजे पण हृदय,श्वास जागे.
न कळे शरीर व्यवस्था चोख चालवी कोण?
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

आस्तिक सारे देवावर विसंबती.
नास्तिक स्वत:वर भिस्त ठेवती.
वैचारिक मर्यादा न उलंघे कोण.
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

कोण्या अज्ञात शक्तीने भव्य सृष्टी निर्मिली.
अदृश राहून सतत ती इमाने चालवली.
पण या महान कलाकृतीला दाद देणारे कोण?
प्रश्न कांहीसा सुटे , मी कोण? आपण कोण?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे०४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Mi Kon? Apan Kon?)

Tuesday, January 4, 2011

मक्याच्या शेतात...



हात दे हातात.
फिरू मक्याच्या शेतात.
जवळ मला तू जरा येऊ दे.
अन कानात गुलू-गुलू बोलू दे.

नथ माझ्या नाकात.
ज्वानी माझ्या धाकात.
दूर मला असी तू जाऊ दे.
माझ ऐन्यात रूप मला पाहू दे.

अग जाऊ दूर-दूर ग.
माझ्या प्रेमा आला पूर ग.
जवळ मला तू जरा येऊ दे.
अन कानात गुलू-गुलू बोलू दे.

मला ठाव तुझा नूर र.
नको येऊ लाडात ,जा दूर र.
दूर मला असी तू जाऊ दे.
माझ ऐन्यात रूप मला पाहू दे.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे०५/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Makyachya Shetat)