Tuesday, February 22, 2011

Birds Idol


एकदा साऱ्या पक्ष्यांचे Birds Idol भरले.
Judge म्हणून तोता मैना आणि मोर ठरले.

झाडून साऱ्या पक्ष्यांच्या audisions झाल्या.
सर्वांनी आपापल्या सरगम तन्मयतेने गायल्या.

गायनासाठी आला कोंबडी सह कोंबडा.
कुकूचकू करून पठ्यान dance केला रांगडा.

चिऊ आणि काऊ गायला जोडीन आले.
चिव-चिव काव-काव मस्त मजेन गायले.

वटवाघूळ अन घुबडाची स्वारी झोपेतच आली.
दिवसा गाता न आल्यान त्याची फजिती झाली.

कोकिळेला होता स्वता:च्या आवाजाचा गर्व.
म्हणे नाही गाणार जर गाणार असतील सर्व.

कबुतराला गायला हजर राहता नाही आलं.
अचानक एक Urgent निरोप द्यायचा गेलं.

उंच –उंच आभाळात फिरत राहीली घार.
गायला यायला तिला उशीर झाला फार.

मासोळी साठी बगळ्याने समाधी लावली पाण्यात.
Mood नाही आला त्याला गायला येण्यात.

अंतिम गायकांची लिस्ट जारी झाली.
चक्क चिऊ आणि काऊ final ला आली.   

चिऊला खालची पट्टी उत्तम जमली.
गाताना वरच्या पट्टीला ती फारच दमली.

काव काव गायनानं काउवर परीक्षक चिडले.
पण SMS च्या संख्येन त्याचे गुण खुप वाढले.

शेवटच्या फेरीत काऊ कुहू कुहू करून नाचला.
 पहिला Birds Idol जिंकून काऊने इतिहास रचला.

वर्षानुवर्षेचे उपकार कोकिळेने असे फेडले.
काऊ ऐवजी stage वर कुहू कुहू गीत गायले.

गीतकार: बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २२/०२/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


Wednesday, February 16, 2011

सख्या ये आता... (नटरंग मधील “खेळ मांडला” वेगळ्या रंगात)


(“नटरंग” या चित्रपटातील “खेळ मांडला”या गीतावर आधारित.)

वाट किती पाहू डोळा झोप येत नाही.
कुस किती बदलू मी आई जागी होई.

विचारी ती पुन्हापुन्हा झोप का ग नाही.
माझिया मनाची स्थिती काय सांगू बाई.
तुझ्या वाचून रे सख्या,क्षण युग आता.
लवकर ये रे आता.
सख्या ये आता.... ये आता …. ये आता....(२ वेळा)
सख्या ये आता.... ये.... सख्या ये आता

सोडून तु गेला मला,छोटा माझा रे गुन्हा.
मागेन मी माफी ,चूक होणार रे ना पुन्हा.
कोणासाठी जगू इथे, खुप दूर तु गेला.
दूर जाता एक याद का रे आली ना तुला.

काळ खुप लोटला ग बाई, निरोप तुझा रे नाही.
येशील का फिरून माघारी, सख्या तु रे मुरारी.
ये रे ये येरे आता ,बघू नको अंत रे.
आसवांच्या वाहण्याला मिळू दे उसंत रे.
तुझ्या वाचून रे मला माझी ना ओळख.
कोणा सांगू माझी ही व्यथा.
सख्या ये आता.... ये आता .. ये आता....

गीतकार: बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०२/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


Sakhya Ye Ata (Different Shade of song "Khel Mandala-Natrang")

Thursday, February 10, 2011

म्हाई



होई जोर गारव्याचा कमी.
ना लागे आता सकाळची धूमी.
दिन म्हाई पोर्णिमेचा नक्की झाला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.

देवर्डे ग्रामी सदा तुझा रे वास.
साऱ्यांची तुजवर मर्जी ती खास.
कृपा प्रसाद जन सारे मागती तुला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.

सुगीचे श्रमाचे दिन ते संपले.
त्या घामाचे आता मोती रे झाले.
तुज सर्वानी पुजण्याचा दिन तो आला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.

तुज मंदिरी मोठी यात्रा भरे.
महापूजेचा नाद भरून उरे.
पालखी सोबत हर-हर जयघोष रे झाला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.

आता सगे-सोयरे जमतील भवती.
इष्टमित्रांसह झडतील खास पंगती.
घरी-दारी माणसांचा महासागर रे झाला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.

ग्रामवासियांना तु आता प्रसन्न व्हावे.
आशा –आकांक्षांना साऱ्या पुर्णत्व द्यावे.
थोड उतराई होण्याचा दिन तो आला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १०/०२/२०११
 Mhai - Jatra

Sunday, February 6, 2011

पाव्हणा

टकामका बघतोय ग (२ वेळा)
ह्यो पुण्याचा पाव्हणा.
आणि करतोय ग ,माझ्या जीवाची दैना (३ वेळा)
हो ..... ||धृ||

जाऊ कशी ? वेडी पिशी ,
झाले बघून ग त्याच रूप.
व्हटावर भारी मिशी ,
लावी पिसं ,झाले बाई चुप.||१||

टकामका बघतोय ग....... ||धृ||

शीळ मारी , होई भारी ,
उरात ग धड – धड.
तो खुणावी ,डोळा मारी,
बाई झाले मी नजरबंद.||२||

टकामका बघतोय ग....... ||धृ||

जवळ आला ,विडा दिला,
धरी दंडाच बाजुबंद.
मोका दिला , धोका केला,
बाई झाली सारी गडबड.||३||

टकामका बघतोय ग....... ||धृ||
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ६/०२/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Pavhana

Thursday, February 3, 2011

उंदीर दादा



तुरू-तुरू चालतो , ची-ची करून बोलतो.
चाहूल लागता माझी , दूर कोपर्‍यात पळतो.

मनी माउशी का रे तुझ सदाचच वाकड.
पाहताच तिला घाबरून तु गाठतोस बाकड.

उंदीर दादा - उंदीर दादा, थांब तर खरा.
माझी एक विनंती, ऐक ना रे जरा.

खेळायला माझ्याशी, आज चिंटू नाही आला.
भांडखोर चिंगीशी ,काल माझा अबोला झाला.

माझ्या या खेळात हो भिडू तु माझा.
बन तु भामटा चोर ,बनेन मी शूर राजा.

तु काय बुवा, गणेशाचा दोस्त!
ऐटीत बसतो बाजुला, लाडू करतो फस्त.

ये – ये उंदीर दादा,माझ एक काम कर ना रे.
गणेशाला सांगुन , खेळायला चांदोबा दे ना रे.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३/०२/२०११
 प्रतिक्रिया अपेक्षित
(Undir Dada)