Saturday, November 12, 2011

काव्य अक्षता


चि. सौ. कां. प्रियांका 

आणि 

चि. प्रमोद 

यांच्या 

शुभ विवाहा प्रित्यर्थ उधळलेल्या काव्य अक्षता. 

वंदन प्रथम करू या शुभंकर श्रीगणेशाला. 
कृपेन श्रीरामाच्या हा मंगल समय आला. 
श्रीजोतिबा कुलदैवताची सदा लाभली छाया. 
वर्षाव सुखांचा अविरत,सवे सकलांची माया. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||१|| 

आंतरजालचे सहाय खास,जाहले तयांचे प्रथम दर्श. 
प्रियांका वरे प्रमोदास, जाहला सर्वास बहुतही हर्ष. 
आज सोनियाचा दिन आला,उत्साहानं भरून गेला. 
सनईचा सुस्वर घुमला ,चौघडा सवे सुरात रमला. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||२|| 

पपा मोहन शांत सज्जन,ममा शालन मायेच गुंजन. 
केलं फुलापरी संगोपन,अन् दोहोंच सुसंस्कारीत मन. 
राहुलदादा,कर्तुत्व मोठं,स्वप्नावहिनीची खंबीर साथ. 
गोड भाचे रायन,सिद्धांत,लीलांचा काय वर्णावा वृतांत. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||३|| 

लेक लाडकी आज जाईल,सासरला नांदण्या सुखान. 
लोभस स्वभावे जिंकेल सासू,सासरे,नणंद,पतीचे मन. 
निरोप घेता माहेरचा आता, दाटेल कंठ भरेल नयन. 
आठवांची होईल गर्दी तुडुंब,आठवेल पार ते बालपण. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||४|| 

सुहास्य वदना प्रियांका आज,प्रमोदाची “प्रिया” जाहली. 
प्रमोद भरेल जीवनात “मोद” ,बनून सुखाची गर्द सावली. 
उधाण येवो आता आनंदास ,चहुबाजूंनी व्हावा उत्कर्ष. 
संगणकतज्ञ दोहोंस लाभो, “नांदा सौख्यभरे” आशिष. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||५|

रचना आणि स्वर : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ११/११/११