Showing posts with label प्रेम कविता. Show all posts
Showing posts with label प्रेम कविता. Show all posts

Tuesday, January 25, 2011

साजन

स्वप्नी माझ्या मज साजन दिसावा.
खोडी काढून गोड गाली हसावा.
धरेन तयासी मग लटका रुसवा.
जाईन दूर टाकून कटाक्ष फसवा. 

भ्रमरापरी तो येईल मागुन.
लपेन मी फुल अन वेलीं मधुन.
घमघमेल चारी बाजुनी गंध.
हळुच मागुन तो नयन करेल बंद

उगा-उगा झोंबेन सोडवण्या मज.
सर्वांगातून झंकारेल मधुरसा साज.
वाटे मज हृदयाशी घट्ट तयाने धरावे.
ओठांनी अमृताचे प्याले रिते करावे.

तनु तयाच्या सदा विळख्यात रहावी.
अजंठाची ती युगुल मूर्तच भासावी.
क्षणा- क्षणाचे एकेक युग व्हावं.
प्राण प्रियाचं स्वप्न आता सत्यात यावं

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०१/२०११
 (Saajan)

Sunday, December 5, 2010

पहिलं प्रेम

नजरेची भाषा नजर समजते.
वा मुलाकातीतून गुज उमलते.
हृद्याचे न्यारे स्पंदन घडते.
ओठांना मग कोरड पडते.

काय झाले न कोणास कळते.
मनात अविरत हुर – हुर मोहते.
आता कोणाचे भानच नसते.
भेटीसाठी मन व्याकुळ होते.

अन हेच ते पहिले प्रेम असते.
विधात्याची मोठी देन असते.
लाभले तर नसीब महान असते.
नाहीतर आठव रूपी डायरीच पान असते.

पहिल्या प्रेमाचा तो कस्तुरी गंध.
सर्वकाळ मनास सुखावी मंद – मंद.
पहिल्या प्रेमाची नशाच वेगळी.
तुल्य ना कशाशी , धुंदीच आगळी.

कवी : बाळासाहेब तानवडे 

 © बाळासाहेब तानवडे ११/११/२०१०