Showing posts with label प्रेरणादायी कविता. Show all posts
Showing posts with label प्रेरणादायी कविता. Show all posts

Friday, October 19, 2012

मराठी माणसा...

मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला  धंदा तरी   नाही सुयशाची हमी.
आता  द्यायचाय छेद , या समजुतीला. 
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

उच्च  शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय बाळा.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला. 
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता हा  धाडसी  निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

एवढ्यावरच  समाधान तुजला नसावं.
आता   सुंदरशा  स्वप्नांच जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे १९/१०/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.in/

Saturday, August 13, 2011

बुलंद आशा



मलाही उंच आकाशात उडायच आहे,
पण पंखात बळ कोठून आणू?

मलाही उंच शिखरं गाठायची आहेत.
पण पायात बळ कोठून आणू?

त्यांना नशिबवान म्हणावं का?
जे आज उंच आकाशात भरार्‍या मारतात.

हो कारण त्यांचा आज चांगला आहे.
पण मी आज का निराश व्हावं?

कारण सगळेच दिवस सारखे नसतात.
उद्या माझ्याही पंखात वीज संचारेल.

माझ्याही पायात सामर्थ्य येईल.
कदाचित उद्या मी आकाशाला गवसणी घालेन.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २०/०६/२०११

(Buland Asha)

Sunday, April 3, 2011

संकल्प सिद्धी


 
मिळेल जीवनात खात्रीने जय.
पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय.

स्वप्नरंजनातच न व्हावं चकित.
कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित.

नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे.
अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे.

सार्‍या कल्पनांची आता योजना बनु दे.
प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे. 

नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट.
पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट.

आता ना कशाची वाट पहावी.
तत्काळ कार्याला सुरुवात करावी.

एक ही दिन ना व्यर्थ असावा.
अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा.

लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं.
मनाजोग यश सर्वास मिळावं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Sankalp Siddhi

Friday, December 24, 2010

Secret

निसर्गाचा आकर्षण नियम आता सिद्ध आहे.
इच्छित पैसा ,मनाजोग प्रेम आता सहज साध्य आहे.
हे ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

निसर्गाला तुमचा आदेश कळेल, इप्सित साध्य हमखास मिळेल.
सुखांचा वर्षाव होऊ लागेल, जणू अलाउदिनचा जादुई दिवाच लाभेल.
म्हणून सर्वांचच जीवन ,सुख-समृद्धीने वहाव.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

दु:ख उगाळून दुःखच मिळेल,कल्पित सुखाने सुखच बरसेल.
थोडं मागा प्रचिती मिळेल,विश्वास निसर्ग नियमांवर बसेल.
यासाठी ‘Rhonda Byrne’ चे ‘Secret’ पहाव.नाहीतर मातृभाषेत ‘रहस्य’ वाचावं.
आणि जीवनाचं रहस्य आता सर्वास कळावं.

© बाळासाहेब तानवडे२४/१२/२०१०
http://hindikavitablt.blogspot.com/ 


प्रतिसादाची प्रतिक्षा

Thursday, December 16, 2010

कल



आई म्हणे तू हेच कराव. 
बाबा म्हणती तू हे ध्येय धरावं. 
मला न कळे अस का व्हाव . 
दोन्ही पासून मन दूर दूर पळाव. 

शाळेच्या विषयांत रस नसावा. 
कॉलेज मिळे पाहून गुणांच्या धावा. 
मला न कळे अस का व्हाव . 
शिक्षणाच पर्व असच वाया जाव. 

नोकरी मिळे पाहून पदवी. 
नावडत्या कामाचं स्वरूप पदोपदी रडवी. 
मला न कळे अस का व्हाव . 
नऊ ते पाच मध्ये जीवन धडपडत जावं. 

या सर्वाला का जीवन म्हणावं. 
ज्यात तडजोडीन कसंतरी जीन जगावं. 
म्हणुन स्वत:ची क्षमता आणि कल स्वत:च जाणावा. 
जीवनाच्या प्रत्येक टप्यात फक्त आनंदच मिळवावा.


कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे – १६/१२/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/

(Kal)



Sunday, December 5, 2010

आई


आईमुळेच आपल्यास अस्तित्व लाभे. 
तिच्याच आशीर्वादाने जीवन सफल उभे. 
तिच्यासारखे दैवत नाही जगती. 
आईची काय सांगावी महती. 

सर्व अपराध पोटात घेई. 
बदल्यात प्रेमाचा सागर देई. 
तिच्या वात्सल्याची आहे जगात कीर्ती. 
आईची काय सांगावी महती. 

आईत देव वसतो मूर्तिमंत. 
कुठे देव पाहू ही नसावी खंत. 
हिच्या सानिध्यात ना कशाची भीती. 
आईची काय सांगावी महती. 

आई लाभने , भाग्य मोठे. 
समोर तिच्या ब्रम्हांड खोटे. 
तिच्यासमोर पडती फिकी सर्व नाती. 
आईची काय सांगावी महती. 

वर्णन करण्या तिचे शब्द पडती थिटे जसे. 
आई हेच एक प्रेमाचं महन्मंगल काव्य असे. 
भले भले तिच्या गुणांचे पोवाडे गाती. 
आईची काय सांगावी महती. 

शेवटी तिची सेवा हाच धर्म मानवा. 
तिच्या अनंत उपकारांचा विसर कधी ना पडावा. 
अखंड सेवेत जागवाव्या राती. 
आईची काय सांगावी महती. 

कवी : बाळासाहेब तानवडे 


© बाळासाहेब तानवडे – ०४/१२/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/






Friday, December 3, 2010

40 Plus Club

 जीवन चाळिशीच्या समीप येते.
आयुष्याला हवे तसे स्थैर्य लाभते.
भौतिक सुखांची बरसात असते.
कौटुंबिक सौख्याची खैरात राहते.

विविध व्यसनांच्या अतिरेकाने.
जबाबदाऱ्यांच्या सतत ताणाने.
योग्य निद्रेच्या अभावाणे.
शरीराचे मग चाले रडगाणे.

कधी ह्र्दयाची धडकन चढते.
कधी शर्करेची मर्जी नडते.
सांधेदुखीची धाडच पडते.
भविष्याची मग चिंता गढते.

विविध डॉक्टरांचे उंबरे झीजतात.
विविध रीपोर्टसचे ढिगच पडतात.
बिलांची किंमत वाढत जाते.
पण हाती शेवटी शून्य येते.

या सर्वांचा नाद सोडावा.
सकस आहार - विहार करावा.
‘योग’ अभ्यासाची सांगड घालून,
प्राणायाम - ध्यानाशी संग धरावा.

हे नित्य -नियम ना भंग करावे.
आळसाशी मनाविरुद्ध जंग करावे.
सकारात्मक विचारांच्या साथीने,
आपल्या अमूल्य जीवनात, खुशीचे सप्त रंग भरावे.

कवी : बाळासाहेब तानवडे

 © बाळासाहेब तानवडे २६/१०/२०१०