Showing posts with label चौफेर. Show all posts
Showing posts with label चौफेर. Show all posts

Wednesday, April 25, 2012

Bachelors Party


मित्र वा मैत्रिणीच्या लग्नाचा मुहूर्त पक्का होतो. 

Single Status च्या निरोपाचा सोहळा आगळा ठरतो. 

या celebrationला मुले म्हणती Bachelors Party. 

मुलीच मागे का? त्यांचीही असते Spinster Party. 


नव्या नव्या कल्पना , ठरती नवे नवे plan. 

celebration ला ना मर्यादा ना कशाचे भान. 

उल्हास अन उत्साह जणु फसफसती शाम्पेन. 

फुल्ल टू धमाल, दंगा मस्ती,अन only gain. 


घेराव घालती उत्सव मूर्तीस छेडून करती तंग. 

नाना तऱ्हांनी उडवून खिल्ली मौजेत होती दंग. 

चेष्टा मस्करी गोड गुलाबी हवी हवीशी वाटते. 

मग छुईमुई मन,तयाच सातव आसमान गाठते. 


मोलाच्या अनुभवांचे रात्रभर भडीमार चालतात. 

चांगले जरा कमीच,ज्यादा Dangerच असतात. 

अनुभवांच्या त्या बोलांनी थोड कसनुसं वाटत. 

पण “तो” सिद्धांत आठवून मनास हायस वाटत. 


(सिद्धांत: शादी के लड्डू जो खाए सो पछताए और जो न खाए वो भी पछताए|) 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २५/०४/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.com/

Monday, August 1, 2011

माझा गांव


प्रातःकाळीच्या सूर्याची प्रभा दिसे सोनेरी छान.
चारी बाजूनी निसर्गाची , आहे मुक्त उधळण.

धनवान ,गुणीजन गाजे पंचक्रोशीत नाव.
असा सर्वांग सुंदर आहे, देवर्डे माझा गाव.

असा सुजन लाभला गावच्या प्रत्येक आळीत.
स्वच्छ,तंटामुक्त गाव राहील कित्येक पर्वात.

जातपात भेद नाही भाईचारा भरून राही.
मना-मनात ,घरात रामराज्य नांदू पाही.

आहे मेहेरनजर खास, साऱ्या ग्रामदैवतांची.
नाही धन-धान्या तोटा, लयलूट समृद्धीची.

सुखसोई साऱ्या झाल्या वीज,पाणी,वाहतूक.
शिक्षणाचे केंद्र झाले, किती करावे कौतुक.

हिरण्यकेशीचा प्रवाह वाहतसे बारमाही.
शेत शिवार फुलते भात ,ऊस ठाई-ठाई.

चिरा इथला प्रसिध्द दूर गावो-गावी जाई.
भुईमुग ,मेसकाठी, काजू मस्त चलन देई.

म्हाई होई दरसाली रवळनाथ देवाची.
पाहुणे-राउळे जमती,येई आनंदा भरती.

चव्हाटी रंगे होळी घरोघरी पुरण पोळी.
फुलतो गोठण लुटण्या सोनं दसऱ्याच्या वेळी.

विठ्ठलाच्या राउळीं या,सदा वैष्णव भजती.
आषाढी-कार्तिकीची वारी,नाही कधी चुकविती.

गायराना गायी-म्हैशी चरुणी तृप्त होती.
गौळदेव ओढ्यात डुंबती,अंगी भरून मस्ती.

माझे नसीब हो थोर, मज लाभला हा गाव.
उतराई होईन मी, वाढवून कीर्ती, नाव.

माझ्या गावाची प्रगती होवो दिवसागणिक.
सर्व क्षेत्रांत राहो माझ्या, देवर्डेची उतुंग झेप.

 कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०१/०८/२०११
Maza Gaav

Saturday, April 30, 2011

बिचारा Subordinate



Corporate जगताची तर्हाच न्यारी.
कामाची Deadline, डोक्याला तापच भारी.
गप्प बसाव लागतं कितीही असाल Bright.
कारण असतं एकच “Boss is always right”
  
यशाच्या श्रेयाला असतात सर्वजण.
Failure ला मात्र नसतो वाली कोण.
Boss Safe करतो स्वतःच Fate.
बळी जातो मात्र बिचारा Subordinate.

HR च्या नव – नवीन Policy येतात.
Seminar,Training चे Classes होतात.
Employeeच्या पदरात फारस काय नसतं.
Training Institute मात्र उखळ पांढर होतं.

Increment ची वेळ जवळ येते.
Appraisal च वादळ तेज होते.
Performance च फक्त नावच असते.
Boss च्या पंटराना झुकते माप मिळते.

 ९ ते ५ चा तुरुंग तर असतोच.
वर Unpaid Overtime चा त्रास सोसतो.
बहुतेक Subordinate  मवाळ असतो.
काय करेल बिचारा? पापी पेट का सवाल असतो.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३०/०/२०११


Saturday, March 19, 2011

होळी आली रे



आला रंगांचा सण.
मौज मस्ती धुमशान.
आज घराघरात पुरण पोळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.

जन भेटीस जाऊ.
शुभेच्छा देऊ घेऊ.
लावु रंग गुलाल भाळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.

रंगात रंगती सारे.
चहुकडे मस्तीचे वारे.
रंगात चिंब सारी झाली रे.
आज वर्षाची होळी आली रे.

सुरक्षेचं भान राखू.
शुध्द रंग उधळू माखू.
रसायन ,घाण नको मळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.

राग-द्वेष ,मतभेद विसरू.
प्रेम,शांती चहुकडे पसरू.
होळी इडा पीडा दु:ख दर्द जाळी रे.
आज वर्षाची होळी आली रे. 

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १९/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Holi Ali Re

Sunday, March 13, 2011

ते हायस्कूलचे सोनेरी दिन........

स्वप्न हायस्कूल, स्वप्न शहर,
पाचवीतच आला स्वप्नांना बहर.
अलंकार टॉकीजचे आता सिनेमे पाहीन.
उठली सर्वांगातून आल्हाददायी लहर.

व्यंकटराव हायस्कूलला झाला प्रवेश.
जणू उच्च शिक्षणाचा होता आवेश.
आज-याची शुद्ध भाषा होती “अरे-कारे”
माझ्या देवर्डे भाषेस बोलती “आरं” शुद्ध बोलणारे.

वाटले अभ्यास असेल फार जड.
म्हणून प्रयत्नांनी केले सर गड.
प्रयत्ने यशाची पावती मिळाली.
पाचवीतच पहिली पोजिशन आली.

Gathering चा होता शौक भारी.
पण झालेच नाही आठवी आली तरी.
आठवी – नववीत मात्र मजा आली.
Gathering ला भरपूर गाणी गायली.

क्रीडा महोत्सवांचा तो काळ काय वर्णु.
अखंड उत्साहाचा चहुकडे असे उत्सवच जणु.
 खो-खो ,कब्बडीचे भारी रंगत सामने.
AHS अन VHS असत आमने – सामने.

 रामतीर्थाच्या ओल्या सहली खास रमत.
चाळोबाच्या वनभोजानास येई न्यारी गंमत.
हंपी-बदामी ,विजापूर सहल केली मोठी.
कोल्हापुर ,गोवा ट्रीप असे अधून मधुन छोटी.

वर्ग बंधू होते शिवाजी ,संभाजी,
तान्या , रव्या ,विज्या अन नऱ्या.
वर्ग भगिनी होत्या सुवर्णा,कल्पना,
पिंटी ,रंजना,मंदा अन छाया.

लाभले खास सारेच गुरुजन.
संस्कारीत झाले अवखळ मन.
गजरे बाई ,चोडणकर,मोरवाडकर सर होते खास.
शिकवताना भरत अनोखे रंग हमखास.

आर.जी. कुरुणकर सर मुख्याध्यापक होते.
सिमला ग्राउंडवर पिटीला घेवडे सर सर्वव्यापक होते.
बी.टी. सुतार सर नी दिला कलेचा आस्वाद.
अष्टपैलू कलावंत होते, हे मात्र निर्विवाद.

मोरवाडकर सर माझ्या ब्याचचे होते सर्वेसर्वा.
विनामूल्य जादा क्लास असत जेंव्हा-तेंव्हा.
अखेर SSC - ८२  चे निकाल जाहीर झाले.
केंद्रात माझ्यासह पहिले सहा VHS चे आले.

सरस्वतीला आहे सदा वंदन माझे.
शाळेचे ते दिन जस चंदन ताजे.
दिवसामागून – दिवस किती ते गेले.
पण आठवणींचे ढग अजूनही ओले.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १२/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


(Te Highscool che Soneri Din)

Friday, January 14, 2011

Internet राजा.......


Internet राजा, तु आला, तुला जगाने पाहीले आणि तु जिंकला.
अविरत सेवांचा ओघ देताना ना रे कधी तु थोडासाही थकला.

पदार्पणातच जगास दिलास तु सुसाट e-mail.
वर्षानुवर्षांच्या पत्रास बनवलेस क्षणात snail mail.

Internet राजा, तु रे आहेस फारच फार great.
जगभरच्या आप्त-मित्रांशी भेट घडवशी थेट.

दिल्यास अनंत chat room तु ,सतत चालती गप्पांचे फड.
कुणी संसार सुखास मुकले ,कुणी प्रेमाचे केले सर गड.

तुझ्या आकर्षणाने झाले सारे जगच रे वेडे.
बनवलेस जग सारे एक global खेडे.

Internet राजा, तुझ “दुधारी तलवार” दुज name.
बऱ्या वाईट प्रवृतीशी वागणं तुझ same.

माहिती ,खेळ आणि मनोरंजन सेवा देशी तु मुफ्त.
पण तुझा दुरुपयोग जे करती, तयासी व्हावस आता तु सक्त.

राजा तुझ्या उद्गात्याला,Vinton Grayला कोटी-कोटी धन्यवाद.
ऋणात राहील जग सारे हे मात्र निर्विवाद.


 कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे१४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

Sunday, December 5, 2010

Diplomats

Diplomats
KIT90 -Production च्या ब्याचला होतेDiplomats आठ.
इतरही दोघे त्यांना सामील होते ही होती खास बात.

प्रत्येकाची होती जगावेगळी तऱ्हा.
खाली वाचून पाहून तुम्हीच काय ते ठरवा.

बालींगेच्या गिऱ्याची होती, एक टोपी अन एक TVs 50.
पहिले सहा महिने होतीत्याची सर्वांशीच कट्टी.

रत्नागिरीच्या जीवण्याचे होतेमोजून मित्र आठ.
मेसपासून कॉलेज पर्यंत मैत्रिणी होत्या मात्रसतराशे साठ.

वॉलचंदनगरचा पश्या असेकॉलेज मध्ये कमीआणि आजारीच फार.
Trecking च्या गप्पा मात्र मारी भारंभार.

इशावाश्यमच्या जयद्याचीहोती बातच न्यारी.
सुध्या - बाळ्या मारीत त्याच्या ,लुनाची एक -एक फेरी.

बारामतीच्या हर्षाच काम कमीअन जयद्या सोबत लचकनच फार.
नेहरूनगरच्या सुज्याशी त्याची जुंपे सदा सर्व काळ.

केनवडेच्या बाळ्याच्या बडबडीलागोंगाटाची धार.
देवर्डेच्या बधीर सुध्याचा होतामेंदू गारे – गार.

रेल्वे फाटक वाल्या सुन्याचीहोती तोंडभर दाढी.
सुज्याच्या साथीने सर्वांच्यासदा खोडया काढी.

नेहरुनगरवाल्या सुज्याचाबंगला होता पॉश.
लांबवर पोहोचतानासोसावा लागेकातडी चपलांचा वास.

शास्त्री नगरच्या जाड्या अंद्याच्या चालतसदा वेगवेगळ्या स्टोऱ्या.
Content कमी पण हसणच खुप कळत मात्र होत्याथोड्या  थोड्या.

असे होते दहाजण ,वेगळे आणि खास.
अलग अलग होते पण ,होता सर्वांचा एकच श्वास.

आता थांबवतोउडवायची खिल्लीअन मागतो सर्वांची क्षमा.
आणि लवकरच सर्वजनकुठेतरी एका ठिकाणी जमा.

कवी : बाळासाहेब तानवडे
 © बाळासाहेब तानवडे /१०/२०१०