Showing posts with label शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label शुभेच्छा. Show all posts

Saturday, January 15, 2011

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला ......



आला संक्रांतीचा सण.
आता शुद्ध करू मन.
जपू तिळगुळ देण्याचा वसा.
करून गोड बोलाची आशा.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Sankrant Greeting)

Thursday, January 13, 2011

संक्रांत Greetings


आकाश विविध रंगी पतंगांनी फुलू दे.
आसमंत उत्साहानी इंच – इंच भरू दे.
बाजरीच्या भाजी – भाकरीन जेवण खुलू दे.
एकमेकास तिळगुळ देवून गोड-गोड बोलू दे.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Sankrant Greeting)

Wednesday, January 12, 2011

संक्रांत सदिच्छा


तिकडं सुर्याच मकर संक्रमण चालू.
इकडं बोचऱ्या थंडीचं आक्रमण चालू.
तिळगुळ खाऊन शरीराचा उष्मा चढवू.
गोड-गोड बोलून एकमेकात स्नेह वाढवू.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Sankrant Greeting)

Tuesday, January 11, 2011

संक्रांत भेट (In Advance)


गुलाबी थंडीत परिसर न्हाऊन गेला.
त्यात डौलत संक्रांतीचा सण हा आला.
एकमेकात उबदार स्नेह वाढवू चला.
तिळगुळ घ्या आणि गोड – गोड बोला.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा

(Sankrant Greeting)

Thursday, December 30, 2010

नव वर्षा तुझे स्वागत............



धरेची पुन्हा एक सूर्य परिक्रमा पूर्ण झाली.
आता तुझ्या आगमनाची तिथी ती आली.
जुने साल चालले परतीचा सलाम मागत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

नव वर्ष सर्वास लाभो सुखाचे,
मौज मजा अन हर्ष मुखाचे.
तुझ्या आगमना प्रती जागेल जगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

तरुणाईचा जोशीला जल्लोष फुलेल.
अबालवृद्धात उत्साह तो भरून उरेल.
तुझ्या स्वागता नसेल आनंदा अंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

झाले गेले सारे विसरून जाऊ.
नवी आशेची सुख स्वप्ने ती पाहू.
जीवनात येऊ दे अजुन खास रंगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

या वर्षात सारे शुभ शुभ घडावे.
ऐतिहासीक नोंदीत तुझे महत्व वाढावे.
तुझ्या नावाची राहो किर्ती दिगंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.


© बाळासाहेब तानवडे३०/१२/२०१०


http://hindikavitablt.blogspot.com/



प्रतिसादाची प्रतिक्षा
(Happy New Year)

Sunday, December 5, 2010

दिवाळी अभिष्टचिंतन.

दिवाळीचा लाभो आतशबाजी आनंद.
धन – धान्याची होवो आवक अखंड.
सुख – समृद्धीचा अविरत मेळ बसू दे.
जीवनात लख- लख तेज सतत बरसू दे .
**************
आली – आली दिवाळी ,तीच स्वागत आनंदाने करू.
आकाशातील तारकांचा होईल धरतीवर पाहुणचार सुरु.
आनंदाचे उधान येऊ दे प्रत्येकाच्या घरी.
अंगणा – अंगणात नाचू दे ,सुख- समृद्धीची परी.
********
कवी : बाळासाहेब तानवडे

 © बाळासाहेब तानवडे ०२/११/२०१०