Showing posts with label लावणी. Show all posts
Showing posts with label लावणी. Show all posts

Monday, September 24, 2012

लवंगी मिरची कोल्हापूरची


ती: लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: रंकाळा, टाकाळा,नागाळा,पन्हाळा, 

मला बाई हाय या समद्याची वड. 

गुजरीत जाऊन, साज मला घेऊन, 

फिरवावा लागल त्यो म्हादार रोड||१|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: शाहूपुरी,लक्ष्मीपुरी,राजारामपुरी, 

हाईत साऱ्या पेठत हाटेलं भारी. 

पावन बसाव लागल जवळ खेटून. 

देवुन रश्याची लज्जत न्यारी||२|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: औन्दाच संपलय बाई वरीस अठरा. 

ज्वानीला माझ्या वाढलाय खतरा. 

दाजीबा आता वेळ लई दौडू नका. 

काढा आता उद्याचा म्हुतूर पक्का||३|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

नुसतं रोकून पावणं पाहू नका. 

आता कशाला त्यो इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं हो माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान

कवी : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे – २५/०९/२०१२
http://kavyarangmere.blogspot.com/


Monday, August 22, 2011

रेव पार्टी (लावणी)....(Rave Party)


ती: टेनटी फोर सेवन कामाचं आलं बाई फॅड.
जादा पैक्यापाई झाल्यात आता समदीच मॅड.
सीसीडी अन् बरिस्त्यात रंगत्यात गप्पांच फड.
मी म्हणती जाईन पर दाजीबाच अडतंय घोड. 


कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
      लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला.
  पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती :सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला.

पोरा – पोरींच फेसबुक असतंय.
टीवटर आणि आर्कुटबी असतंय.
म्हण तेच्यावर गुलूगुलू करत्यात.
रेव पार्टीला जागी एका जमत्यात.
 धूम धमाल असते मौज मस्तीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला||१||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

ती :हातामंदी हे हात कीव धरू.
 डोळ्यामंदी हे डोळ कीव भरू.
डान्स धमाल डिस्को करू.
पार्टीमंदी त्या खान-पिणं करू.
नसल हद्द त्या मादक धुंदीला.
सख्या चल , राया चल जाऊ अपुनबी त्या रेव पार्टीला||२||

कोरस: काम लई झालं बाई आता इक एंड आला.
लवकर चला बाई आता बिगी-बिगी चला,
पोर चालल्यात धमाल  रेव पार्टीला.

शाहीर : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २२/०८/२०११
Rave Party- Marathi Lavani

Sunday, February 6, 2011

पाव्हणा

टकामका बघतोय ग (२ वेळा)
ह्यो पुण्याचा पाव्हणा.
आणि करतोय ग ,माझ्या जीवाची दैना (३ वेळा)
हो ..... ||धृ||

जाऊ कशी ? वेडी पिशी ,
झाले बघून ग त्याच रूप.
व्हटावर भारी मिशी ,
लावी पिसं ,झाले बाई चुप.||१||

टकामका बघतोय ग....... ||धृ||

शीळ मारी , होई भारी ,
उरात ग धड – धड.
तो खुणावी ,डोळा मारी,
बाई झाले मी नजरबंद.||२||

टकामका बघतोय ग....... ||धृ||

जवळ आला ,विडा दिला,
धरी दंडाच बाजुबंद.
मोका दिला , धोका केला,
बाई झाली सारी गडबड.||३||

टकामका बघतोय ग....... ||धृ||
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ६/०२/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Pavhana

Sunday, December 5, 2010

बकुळा

माझ नाव हाय बकुळा.
माझ्या अंगात नाना कळा.
माझ्या साठी सारा जन खुळा.
पडू नका माज्या तुम्ही गळा.
तुम्ही मुकाट घरला पळा दाजी तुम्ही घरला.

कोरस : पिरतीच पाणी हीच तुम्हा दाजी गोड वाटलं.
राघु मैनेच्या पेरूची ही फोड वाटलं.
हिच्या इष्काचा रंग लई न्यारा दाजी लई न्यारा.  

ती :माझ चमचमतय अंग अंग.
जणू पुनवचा त्यो चांद ग.
वर काचोळी झाली बाई तंग.
पर येयाची न्हाई तुम्हा संग.
तुम्ही मुकाट घरला पळा दाजी तुम्ही घरला.

कोरस : पिरतीच पाणी हीच तुम्हा दाजी गोड वाटलं.
राघु मैनेच्या पेरूची ही फोड वाटलं.
हिच्या इष्काचा रंग लई न्यारा दाजी लई न्यारा.  
शाहीर  : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे  ०५/१२/२०१०
Bakula- Marathi Lavani

मी इंद्राची अप्सरा

पायी  वाजे  पैंजण.
छुम  छुम  छननन.
करण्या  नर्तन  भरल्या  दरबारा.
बाई  मी  इंद्राची  अप्सरा.

रूप  माझ  बावनकशी.
जणू  पसरल्या  पाचूच्या  राशी.
चौफेर  वाहे  रूपाचा  वारा.
बाई  मी  इंद्राची  अप्सरा.

रंभा , उर्वशी , मेनका.
त्यांचे  इशारे  पाहू  नका.
माझाच  नखरा  खरा.
बाई  मी  इंद्राची  अप्सरा.
कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे३०/११/२०१०