Sunday, December 5, 2010

दोष कोणा देऊ मी ?


प्रयत्नांती यश नाही.
कोणास त्याची खंत नाही.
कुणाकडे आशेने पाहू मी?
दोष कोणा देऊ मी?

कशासाठी जगत रहावे.
मरणाशी आता लगट करावे.
पण विष घेऊन रोष कुणाचा का घेऊ मी.

दोष कोणा देऊ मी?

जीवन आहे दुष्ट साले.
यश नाही पण कष्टच सगळे.
कुठवर हे साहू मी.
दोष कोणा देऊ मी?

तुजकडे आता एकच मागणे.
हरिमय करावे माझे जगणे.
तुझे नामच सदा गाईन मी.
दोष ना कोणास देईन मी.
कवी : बाळासाहेब तानवडे
 © बाळासाहेब तानवडे १८/११/२०१०

माझिया सख्याला येऊ दे जाग


कळेना   आज  माझा  काय  झाला  गुन्हा.
अव्हेरशी  का मज, आज  पुन्हा  पुन्हा.
निद्रेच्या  विळख्यात   तू , मज  कळेना  राज.
माझिया  सख्याला , येऊ  दे  जाग.

तुजसाठी  केला  मी  सारा  शृंगार.
आसुसले  मन  ,तन  झाले  अंगार.
विराण  भासे  मज , तुजवीण  सारे  जग.
माझिया  सख्याला , येऊ  दे  जाग.

मोहवू  पाहे   मज , रातराणीचा  गंध.
पर  तुझ्या  गंधाचा , मज  लागे  छंद.
मर्दानी  चेहऱ्यावर  वाहे , पौरुष्याची  झाग.
माझिया  सख्याला, येऊ  दे  जाग.

संगतीत  धावे  काळ, थांबला  जणू  आज.
तुझी  ना  साथ , असे  रातकिड्यांची  जाग.
परसाच्या  केवड्यात  फुत्कारतो  नाग.
माझिया  सख्याला , येऊ  दे  जाग.

साहवेना  तुझा  दुरावा,  आता  एकही  क्षण.
आवरू  किती  तयाला , स्वैर  भैर  मन.
पर  जागवू  कशी   बाई, मज  येई  लाज.
माझिया  सख्याला, येऊ  दे  जाग

उगवला  बघ  आता  तो , पहाटेचा  शुभ्र   तारा.
कवळून  मज , दे  मिठीचा  धुंद  फुंद  उबारा.
दीर्घ  चुंबनात  विरू  दे , तुझा  सर्व  राग.
माझिया  सख्याला , येऊ  दे  जाग.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे - २३ /११/२०१०

मी अभिमानी



मला  मिळाली  खास  बुद्धिमत्ता.
माझी  सर्वांवर  चाले निरंकुश  सत्ता.
मला  वाटे  साऱ्या साल्यांचा दुसास.
कारण  मी   खास  ,मीच  आहे  खास.

जे  जे  उत्तम , ते  ते  मलाच  मिळेल.
प्रत्येकाचे  साल्याचे  घरदार  जळेल.
फक्त  माझ्याच  घरी  आहे  धन -धान्याची  रास.
कारण  मी   खास  ,मीच  आहे  खास.

आता  उतरोत्तर होईल  प्रगती  माझी.
कोणालाही  ना  मिळो  धड  भाकरी  ना  भाजी.
प्रत्येकजण  आहे  साला  माझाच  दास.
कारण  मी   खास  ,मीच  आहे  खास.

तुझ्या  अभिमानाला  मर्यादा  असावी.
तुला  सर्वात  समानता  दिसावी.
वेळीच  आवर  नाहीतर , अवेळी  जाईल  श्वास.
कारण  तोच  आहे  खास  ,फक्त  तोच  आहे  खास.

कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे२६ /११/२०१०

आई


आईमुळेच आपल्यास अस्तित्व लाभे. 
तिच्याच आशीर्वादाने जीवन सफल उभे. 
तिच्यासारखे दैवत नाही जगती. 
आईची काय सांगावी महती. 

सर्व अपराध पोटात घेई. 
बदल्यात प्रेमाचा सागर देई. 
तिच्या वात्सल्याची आहे जगात कीर्ती. 
आईची काय सांगावी महती. 

आईत देव वसतो मूर्तिमंत. 
कुठे देव पाहू ही नसावी खंत. 
हिच्या सानिध्यात ना कशाची भीती. 
आईची काय सांगावी महती. 

आई लाभने , भाग्य मोठे. 
समोर तिच्या ब्रम्हांड खोटे. 
तिच्यासमोर पडती फिकी सर्व नाती. 
आईची काय सांगावी महती. 

वर्णन करण्या तिचे शब्द पडती थिटे जसे. 
आई हेच एक प्रेमाचं महन्मंगल काव्य असे. 
भले भले तिच्या गुणांचे पोवाडे गाती. 
आईची काय सांगावी महती. 

शेवटी तिची सेवा हाच धर्म मानवा. 
तिच्या अनंत उपकारांचा विसर कधी ना पडावा. 
अखंड सेवेत जागवाव्या राती. 
आईची काय सांगावी महती. 

कवी : बाळासाहेब तानवडे 


© बाळासाहेब तानवडे – ०४/१२/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/