Friday, February 24, 2012

देवा मला लवकर मोठ्ठं कर


रोजच अभ्यास , रोजच शाळा 
रोजच जाण येण येई कंटाळा 
दफ्तराच वजन तु छोटं कर 
देवा मला लवकर मोठ्ठं कर 

अभ्यासा साठी आईची किटकिट
मस्ती बद्दल ती बाबांची मारपीट 
मारकुट्या दादाचा हात घट्ट धर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

News channel बाबांचं लाडकं 
आईला आवडतं serial रडकं 
सर्वानाच cartoonच वेड भर
देवा मला लवकर मोठ्ठं कर 

दुधासवे Complan पितो घटघट
John,सलमान सारख वाढव पटपट
स्वप्नातल्या वचनाचा नको विसर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २४/०२/२०१२ 

Tuesday, January 3, 2012

का हा दुरावा...("तेरे मेरे बीच में" मराठी Version)


तुझ्या माझ्या प्रेमात ग २ का हा दुरावा कळेना. २ 
मला ही कळेना,तुला ही कळेना २ . 
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. 

तन दोन आपुले ग मन एक आहे २ . 
तुझ्या माझ्या डोळ्यातील स्वप्न एक आहे. 
चूक मी पाहे हो ...शोधून ती पाहे, ती मिळेना२ . 
मला ही कळेना, तुला ही कळेना. 
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. 

तुजवीण एक क्षण युग भासे मज२ 
तुझिया मनात सखये नसाव दुज 
झालं गेलं विसर ग, झालं गेलं विसर, तू येना. 
मला करमेना , मला साहवेना. 
तुझ्या माझ्या प्रेमात ग कधी हा दुरावा नकोना. 

रचना व गायन : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ०३/०१/२०१२

Thursday, December 29, 2011

कळतंय पण वळतंच नाही


अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य. 
होईल जीवनात सार कांही साध्य. 
गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आळसाशी नसाव कदापी मैत्र. 
तयान जीवनाचं बिघडत सूत्र. 
प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

वेळेच महत्व पार पैशांसमान. 
जर पाळलं तयाच व्यवस्थापन. 
करून वेळेत होईल सारच सही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.
मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत. 
मग बुवा अन वैध्यांची फिकीरच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आता वाईट सवयींची गुलामी सोडू, 
अन गांभीर्याशी नित्य नात जोडू.
मग कधी म्हणायची गरजच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २९/१२/२०११ 

Monday, December 5, 2011

Why This kolavery ... Di Marathi Version - Kolhapuri Mard Gadi(कोल्हापुरी मर्द गडी)




मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.
चला वाजवा.
आम्ही कोल्हापूरी .. जगात भारी.

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा. 

रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं.
साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरणं||१|| 

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा. 

पायात चपल कर्रा कर्रा , फेट्याचा झुलतो तुर्रा.
तालमीत जाऊन बैठका मारून,शोभे पैलवान खर्रा||२||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा. 


मित्रानो , तुम्हाला वाटल नुसत्या गप्पा मारतोय....

गप्पा,गप्पा, गप्पा,गप्पा, नाहीत नुसत्या गप्पा.

पटलच आता. 

आमचं बोलणं,चालणं,वागण पाहिलंत.
आता आमचा खाना आणि बाणा कसा तो बघा.

हुं ss तांबडा रस्सा... आमचं खाण बघा... 

तांबडा रस्सा , पांढरा रस्सा वरपतो भुर्र भुर्र.
नाश्त्याला वडा , कट मिसळ आणि चहा फुर्र फुर्र. 

नव नव रोज नव , हॉटेल देतंय चव. 
खाव प्यावं द्यावं घ्याव , होतया मग नाव.

राजा शाहूच आमचं नात , नाही कुणा भीत.
चांगल्याशी चांगल वाईटाशी वाईट, हाय मराठा जात||३||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा. 

कोल्हापुरी .. जगात भारी.


रचना व गायन : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ०६/१२/२०११


Saturday, November 12, 2011

काव्य अक्षता


चि. सौ. कां. प्रियांका 

आणि 

चि. प्रमोद 

यांच्या 

शुभ विवाहा प्रित्यर्थ उधळलेल्या काव्य अक्षता. 

वंदन प्रथम करू या शुभंकर श्रीगणेशाला. 
कृपेन श्रीरामाच्या हा मंगल समय आला. 
श्रीजोतिबा कुलदैवताची सदा लाभली छाया. 
वर्षाव सुखांचा अविरत,सवे सकलांची माया. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||१|| 

आंतरजालचे सहाय खास,जाहले तयांचे प्रथम दर्श. 
प्रियांका वरे प्रमोदास, जाहला सर्वास बहुतही हर्ष. 
आज सोनियाचा दिन आला,उत्साहानं भरून गेला. 
सनईचा सुस्वर घुमला ,चौघडा सवे सुरात रमला. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||२|| 

पपा मोहन शांत सज्जन,ममा शालन मायेच गुंजन. 
केलं फुलापरी संगोपन,अन् दोहोंच सुसंस्कारीत मन. 
राहुलदादा,कर्तुत्व मोठं,स्वप्नावहिनीची खंबीर साथ. 
गोड भाचे रायन,सिद्धांत,लीलांचा काय वर्णावा वृतांत. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||३|| 

लेक लाडकी आज जाईल,सासरला नांदण्या सुखान. 
लोभस स्वभावे जिंकेल सासू,सासरे,नणंद,पतीचे मन. 
निरोप घेता माहेरचा आता, दाटेल कंठ भरेल नयन. 
आठवांची होईल गर्दी तुडुंब,आठवेल पार ते बालपण. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||४|| 

सुहास्य वदना प्रियांका आज,प्रमोदाची “प्रिया” जाहली. 
प्रमोद भरेल जीवनात “मोद” ,बनून सुखाची गर्द सावली. 
उधाण येवो आता आनंदास ,चहुबाजूंनी व्हावा उत्कर्ष. 
संगणकतज्ञ दोहोंस लाभो, “नांदा सौख्यभरे” आशिष. 
आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||५|

रचना आणि स्वर : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ११/११/११ 

Saturday, October 22, 2011

कुणीतरी आहे तिथं.......


अमर्याद आहे ब्रम्हांड न्यारे.
करोडो ग्रह आहेत लाखो तारे.
जीवनाचे विविध पैलू मात्र धरतीवर इथं.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

जस धरतीवर छान वातावरण.
सभोवार पाणी ,प्राणवायू भरून.
जीवनाची असेल तिथं कांही वेगळी रीत.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

वाहतो वारा , जाणवतो वारा.
पण डोळ्यांना ना दिसतो वारा.
परग्रह वासियाचं ही कांहीस असेल तसं 
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

ब्रम्हांडात पृथ्वी जणू छोटासा कण.
जर कणावर निसर्गाच एवढ ध्यान.
उरल्या जगावर निसर्गाची का नसेल प्रीत? 
एवढ मात्र आहे त्रिवार सत्य, कुणीतरी आहे तिथं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २३/१०/२०११

Wednesday, October 12, 2011

स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs -The Apple Man)


धन्य ते माता पिता तयाचे अब्दुलफतेह अन् जोहान.
ऐसे पुत्ररत्न दिधले जगाला,जयाचे कार्य हो खुप महान.

Full जगताच्या Techno savy जनांचे पुरे करण्या सारे ख्वाबस्.
धरती वर अवतरला अलौकिक प्रतिभेचा TecnoCrat Steve jobs.

अविष्कार केले एका मागून एक झाली तुझी रे दिगंत कीर्ती.
करून ‘Apple Inc ची Co-निर्मिती,संवर्धन अन् खुप उन्नती.

तरल कल्पकता अन् दूरदृष्टी तुझी रे,काय ते बुद्धीसामर्थ्य अन् जिद्द.
Technology च्या तुझ्या विशाल Kingdom ला दूरवर नव्हती रे हद्द.

“Apple Inc” च्या प्रगतीचा Index  रे कायम ठेवलास तू Bullish.
तरुणाइस दिलास बहुमोल संदेश “Stay Hungry Stay Foolish”

संगीताच केलस दालन खुल तू, i-tunes अन् i-pod न केली Height.
संगीत प्रेमींच्या गळ्यातला बनलास तू one and only लाडका ताईत.

होता Apple मधून पायउतार तू लढवली ‘NextComputer ची ढाल.
Superhit Animation Films चे ‘Pixar मधून तू पसरलेस मायाजाल.

अखेर “Apple Inc” वाले  आले शरण रे,तुजवाचून त्यांचा खुंटला मार्ग.
 ‘Next सह दाखल झालास पुन्हा तू ,बनून Backbone दाखवण्या स्वर्ग.

जेता असा तू तुजकडे होते , प्रत्येक Hurdle ला योग्य ते Answer.
पण नाही टाळता आला तुला रे , तो दुर्दैवी स्वादुपिंडाचा Cancer.

Gadgets चा राजा तू , जगाला दिलीस Apple ची I-Series i-pod  ते i-pad.
पण अचानक जीवनाच्या Exit ने केलेस,Comman Man ते Obama चे i-Sad.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १३/१०/२०११