मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला धंदा तरी नाही सुयशाची हमी.
आता द्यायचाय छेद , या समजुतीला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.
उच्च शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय बाळा.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.
रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला.
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता हा धाडसी निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.
एवढ्यावरच समाधान तुजला नसावं.
आता सुंदरशा स्वप्नांच जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे १९/१०/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.in/