Friday, October 19, 2012

मराठी माणसा...

मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला  धंदा तरी   नाही सुयशाची हमी.
आता  द्यायचाय छेद , या समजुतीला. 
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

उच्च  शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय बाळा.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला. 
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता हा  धाडसी  निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

एवढ्यावरच  समाधान तुजला नसावं.
आता   सुंदरशा  स्वप्नांच जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे १९/१०/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.in/

4 comments:

  1. मित्रांनो ,
    फक्त कविता लिहून थांबलो नाही. तर सध्य स्थितीत कोणत्या वस्तूंची समाजात जास्त गरज आहे हे हेरून मी "Instant Food Mixes" चा व्यवसाय चालू केला आहे. आता हा व्यवसाय यशस्वीपणे भरभराटीस नेने पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे, तरी पण तुम्हा लोकांच्या good wishes आणि support ने तो यशाची शिखरे गाठेल असा माझा विश्वास आहे.

    Tanawade's Smart Food

    Blog: www.tanawades.blogspot.in
    Facebook Page : https://www.facebook.com/tanawadessmartfood

    ReplyDelete