Sunday, January 13, 2013

शर्मनाक

बस   नव्हे   ती   खुद्द   काळ   होता. 
वासनांचा  आगडोंब    जाळ    होता. 
जणु    असुरी   शक्तीचा   भास होता. 
सुटकेचा   केविलवाणा  ध्यास  होता. 

आक्रोश    आक्रोश   निनादत ओसंडले.
अंग-अंग, रंध्र-रंध्र  तिचे हो रड-रडले. 
दया   राहिली  दूर दूर अज्ञातवासात. 
वासनांनी    पुरे  पुरे  थैमान   मांडले. 

माणुसकीस       काळीमाच   फासला.
विखारी     डंख    मातीसच    डसला. 
इज्जतीचा     पुरता    केला फालुदा. 
जगण्यावर     सुद्धा  आणली    गदा. 

अशी शर्मनाक ना कधी घटना घडावी, 
जीने   शरमेला    ही    शरम   वाटावी. 
पापाच्या  पित्तरालाही    कधी    अशी, 
जबर  शिक्षा   म्हणुनही   ना मिळावी.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०१/२०१३
http://kavyarangmaze.blogspot.com/



2 comments:

  1. चिरंजीव बाळा साहेब,
    अनेक शुभार्शिर्वाद ,तुझा ब्लोग वाचत आहे ,तुमचही कैफियत वाचली ,फारच भावली ,पण कुठेतरी विराणीचे सूर ऐकू येताहेतउमेदीच ते सुवर्ण पर्व हरवलय. मन म्हणतंय तस आता मस्त जगायचय. जे जे जमलं नाही ते ते आता करायचंय. ,"बाळ हे काही खर नाही ,तू एक शब्द प्रभू आहेस ,आणि शब्द सामर्थ्य तू जाणतोसच , तुझ्या वर तर वाग्देवी प्रसन्न आहेच ,तुझ्या सारख्या कवीचा शब्द स्पर्श परिसा सारखा असतो ,तू हात लावशील त्याचे सोने होईल ,मनातली काजळी काढून टाक ,मोकळा श्वास घे आणि मग उश्श्वासाने कळ्यांची हि फुले होतील ,तुझ्या साठी दोन ओळी "नाही सूर तुझा हा नाही तुझी कहाणी चीर ,आनंद यात्री तू गातोस का विराणी "
    शशांक रांगणेकर
    मुंबई
    ९८२१४५८६०२

    ReplyDelete
  2. Kavita kadak aahe
    Balatkari purshanvar malm aahe
    Hi kavita vachun jar konachya madhe ajun asel vasnecha kida
    Tar jaun swatachya aai bahininvar bhida
    He balatkari purshano,
    Vachun aala asel rag jara
    Tar aamachya raigad kilyavar jaun takmak tokavrun udi mara
    Adesh pakhurde
    At po - Raigad
    Jay maharashtra !!!

    ReplyDelete