आला रंगांचा सण.
मौज मस्ती धुमशान.
आज घराघरात पुरण पोळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.
जन भेटीस जाऊ.
शुभेच्छा देऊ घेऊ.
लावु रंग गुलाल भाळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.
रंगात रंगती सारे.
चहुकडे मस्तीचे वारे.
रंगात चिंब सारी झाली रे.
आज वर्षाची होळी आली रे.
सुरक्षेचं भान राखू.
शुध्द रंग उधळू माखू.
रसायन ,घाण नको मळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.
राग-द्वेष ,मतभेद विसरू.
प्रेम,शांती चहुकडे पसरू.
होळी इडा पीडा दु:ख दर्द जाळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १९/०३/२०११
प्रतिक्रीया अपेक्षित
Holi Ali Re
नमस्कार
ReplyDeleteनुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू झाला आहे.तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवाद
धन्यवाद मराठीनेटभेटब्लॉगकट्टा.
ReplyDelete👌👌
ReplyDelete