Corporate जगताची तर्हाच न्यारी.
कामाची Deadline, डोक्याला तापच भारी.
गप्प बसाव लागतं कितीही असाल Bright.
कारण असतं एकच “Boss is always right”
यशाच्या श्रेयाला असतात सर्वजण.
Failure ला मात्र नसतो वाली कोण.
Boss Safe करतो स्वतःच Fate.
बळी जातो मात्र बिचारा Subordinate.
HR च्या नव – नवीन Policy येतात.
Seminar,Training चे Classes होतात.
Employeeच्या पदरात फारस काय नसतं.
Training Institute च मात्र उखळ पांढर होतं.
Increment ची वेळ जवळ येते.
Appraisal च वादळ तेज होते.
Performance च फक्त नावच असते.
Boss च्या पंटराना झुकते माप मिळते.
९ ते ५ चा तुरुंग तर असतोच.
वर Unpaid Overtime चा त्रास सोसतो.
बहुतेक Subordinate मवाळ असतो.
काय करेल बिचारा? पापी पेट का सवाल असतो.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३०/०४/२०११
No comments:
Post a Comment