मलाही उंच आकाशात उडायच आहे,
पण पंखात बळ कोठून आणू?
मलाही उंच शिखरं गाठायची आहेत.
पण पायात बळ कोठून आणू?
त्यांना नशिबवान म्हणावं का?
जे आज उंच आकाशात भरार्या मारतात.
हो कारण त्यांचा आज चांगला आहे.
पण मी आज का निराश व्हावं?
कारण सगळेच दिवस सारखे नसतात.
उद्या माझ्याही पंखात वीज संचारेल.
माझ्याही पायात सामर्थ्य येईल.
कदाचित उद्या मी आकाशाला गवसणी घालेन.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २०/०६/२०११
(Buland Asha)
No comments:
Post a Comment