Thursday, December 29, 2011

कळतंय पण वळतंच नाही


अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य. 
होईल जीवनात सार कांही साध्य. 
गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आळसाशी नसाव कदापी मैत्र. 
तयान जीवनाचं बिघडत सूत्र. 
प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

वेळेच महत्व पार पैशांसमान. 
जर पाळलं तयाच व्यवस्थापन. 
करून वेळेत होईल सारच सही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.
मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत. 
मग बुवा अन वैध्यांची फिकीरच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आता वाईट सवयींची गुलामी सोडू, 
अन गांभीर्याशी नित्य नात जोडू.
मग कधी म्हणायची गरजच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २९/१२/२०११ 

Monday, December 5, 2011

Why This kolavery ... Di Marathi Version - Kolhapuri Mard Gadi(कोल्हापुरी मर्द गडी)




मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.
चला वाजवा.
आम्ही कोल्हापूरी .. जगात भारी.

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा. 

रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं.
साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरणं||१|| 

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा. 

पायात चपल कर्रा कर्रा , फेट्याचा झुलतो तुर्रा.
तालमीत जाऊन बैठका मारून,शोभे पैलवान खर्रा||२||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा. 


मित्रानो , तुम्हाला वाटल नुसत्या गप्पा मारतोय....

गप्पा,गप्पा, गप्पा,गप्पा, नाहीत नुसत्या गप्पा.

पटलच आता. 

आमचं बोलणं,चालणं,वागण पाहिलंत.
आता आमचा खाना आणि बाणा कसा तो बघा.

हुं ss तांबडा रस्सा... आमचं खाण बघा... 

तांबडा रस्सा , पांढरा रस्सा वरपतो भुर्र भुर्र.
नाश्त्याला वडा , कट मिसळ आणि चहा फुर्र फुर्र. 

नव नव रोज नव , हॉटेल देतंय चव. 
खाव प्यावं द्यावं घ्याव , होतया मग नाव.

राजा शाहूच आमचं नात , नाही कुणा भीत.
चांगल्याशी चांगल वाईटाशी वाईट, हाय मराठा जात||३||

मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा. 

कोल्हापुरी .. जगात भारी.


रचना व गायन : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ०६/१२/२०११