Thursday, December 29, 2011

कळतंय पण वळतंच नाही


अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य. 
होईल जीवनात सार कांही साध्य. 
गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आळसाशी नसाव कदापी मैत्र. 
तयान जीवनाचं बिघडत सूत्र. 
प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

वेळेच महत्व पार पैशांसमान. 
जर पाळलं तयाच व्यवस्थापन. 
करून वेळेत होईल सारच सही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.
मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत. 
मग बुवा अन वैध्यांची फिकीरच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

आता वाईट सवयींची गुलामी सोडू, 
अन गांभीर्याशी नित्य नात जोडू.
मग कधी म्हणायची गरजच नाही. 
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २९/१२/२०११ 

1 comment:

  1. खुपच छान !!!
    आपण माझ्याविशयी थोडेसे जे लिहिले ते खूप छान वाटले प्रत्येकाच्या मनातल्या भावना तुम्ही मांडल्या

    ReplyDelete