Tuesday, January 3, 2012

का हा दुरावा...("तेरे मेरे बीच में" मराठी Version)


तुझ्या माझ्या प्रेमात ग २ का हा दुरावा कळेना. २ 
मला ही कळेना,तुला ही कळेना २ . 
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. 

तन दोन आपुले ग मन एक आहे २ . 
तुझ्या माझ्या डोळ्यातील स्वप्न एक आहे. 
चूक मी पाहे हो ...शोधून ती पाहे, ती मिळेना२ . 
मला ही कळेना, तुला ही कळेना. 
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. 

तुजवीण एक क्षण युग भासे मज२ 
तुझिया मनात सखये नसाव दुज 
झालं गेलं विसर ग, झालं गेलं विसर, तू येना. 
मला करमेना , मला साहवेना. 
तुझ्या माझ्या प्रेमात ग कधी हा दुरावा नकोना. 

रचना व गायन : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ०३/०१/२०१२

1 comment:

  1. नमस्कार, मराठी ब्लॉग जगत्‌वरील आपल्या ब्लॉग नोंदीमधे आवश्यक तो बदल केलेला आहे. म.ब्लॉ.ज.च्या फेसबुक पेजला व ट्विटर पेजला देखील अवश्य भेट द्या.

    ReplyDelete