बस नव्हे ती खुद्द काळ होता.
वासनांचा आगडोंब जाळ होता.
जणु असुरी शक्तीचा भास होता.
सुटकेचा केविलवाणा ध्यास होता.
आक्रोश आक्रोश निनादत ओसंडले.
अंग-अंग, रंध्र-रंध्र तिचे हो रड-रडले.
दया राहिली दूर दूर अज्ञातवासात.
वासनांनी पुरे पुरे थैमान मांडले.
माणुसकीस काळीमाच फासला.
विखारी डंख मातीसच डसला.
इज्जतीचा पुरता केला फालुदा.
जगण्यावर सुद्धा आणली गदा.
अशी शर्मनाक ना कधी घटना घडावी,
जीने शरमेला ही शरम वाटावी.
पापाच्या पित्तरालाही कधी अशी,
जबर शिक्षा म्हणुनही ना मिळावी.