माझी पुतणी,
चि.सौ.कां. प्रियांका आणि चि. सागर
यांच्या दिनांक ११
मे २०१५ रोजी संपन्न झालेल्या शुभ विवाहाप्रित्यर्थ उधळलेल्या
काव्य अक्षता
श्री कृपेने हा खेळ सजला.
महादेवा ते वंदन तुजला.
रवळनाथाने दिधले यांना, समृद्धीचे दान.
सावधान शुभमंगल सावधान २ || १||
आनंदी – लक्ष्मण , आजी – आजोबा.
सुमन – मारुती , आई – बाबा.
भैय्या निलेश ची ही लाडी , बहिण ‘प्रियांका’ छान.
सावधान शुभमंगल सावधान २ || २||
काका – आत्या , मावशी – मामा.
कौतुक करण्या झाले जमा.
लहान – थोर , पै – पाहुणे , गोतावळा हा महान.
सावधान शुभमंगल सावधान २ || ३||
ही लेक लाडकी आई-बापाची.
आज होईल पाहुणी माहेराची.
स्व-जनांचे डोळे झरती, आठवून तिच्या विरहान.
सावधान शुभमंगल सावधान २ || ४||
दिन हा मंगलमय जो आला.
आसमंत ही
सुखे गुंजला.
‘सागर’ वरे नवरी ‘प्रियांका’ , सोहळा भव्य महान.
सावधान शुभमंगल सावधान २ || ५||
रचना आणि गायन:
श्री. बाळासाहेब तानवडे
०१ मे २०१५
सौभाग्याकांक्षिणी
ReplyDeleteVery nice
ReplyDelete