Friday, January 21, 2022

मंगल अक्षता - (चिरंजीव विजय आणि चि. सौ.कां. रुचिरा)





चिरंजीव विजय आणि चि. सौ.कां. रुचिरा यांच्या २६/१२/२०२१ रोजी पुण्यनगरी इथे झालेल्या
मंगल विवाहा प्रीत्यर्थ उधळलेली काव्य सुमनं..

श्री तुझ्या वंदनाने ,शुभकार्ये प्रारंभतो.
अंबे तुझा वरदहस्त ,कायमच स्मरतो.
या मंगल कार्यास, तुम्ही तडीस न्यावे.
तुम्हा चरणी आम्ही ,मागणे हे मागतो.ll१ll


सनई चौघड्याचे, गुंजती मंगलमय सुर.
भारावला तो जन,आला आसमंती नुर.
पुण्य नगरीत,पंचतारांकित या सुस्थळी,
शुभ लग्न समारंभी,आहे मजाच आगळी.ll२ll


श्रीधर-जयश्री ने जणू ,"विजय" हिराच घडवीला.
कर्तृत्वे गायकवाड कुली, त्याने उद्धार केला.
रुचिरा सह आता, विजयी संसार तो रंगेल.
साता समुद्रा पार ,कर्तुत्व बे-लगाम बहरेल.ll३ll


गायकवाड-चौधरी गठबंधन, होइल सुखाचे.
सुखी,आनंदी ,खास समृद्ध ,भावी आयुष्याचे.
आता असेल जीवनी ,आनंद अन् हर्ष उल्हास.
सदा उत्सव च जणू, सभोवार आसमंती खास.ll४ll


रुचिरा सह माता पित्या च्या, नयनात पाणी.
निघाली माहेरा सोडुनी, लाडकी लेक ती गुणी.
क्षणो क्षणी दाटेल नयनी, पाणी दीर्घ विरहाच.
पण समाधानी ते दोहो,पाहून सासर लाख मोलाच.ll५ll


शुभआशीर्वाद द्याया, सारा गणगोत जमला.
उत्साही आनंदे ,साऱ्या कार्यक्रमी तो रंगला.
आता मंगल कार्याचा ,परमोच्च क्षण आला.
मंगल अक्षतांचा, चहूबाजूने वर्षाव तो झाला.ll६ll


विजय-रुचिरा चा ,संपन्न झाला महनमंगल सोहळा.
सुखी आयु च्या नांदीचा, शुभसंकेत आगळा.
"नांदा सौख्यभरे " हाच ,तुम्हा एक आशिष.
दोहोंचा संसारसुखी होऊदे,भरभरून उत्कर्ष.ll७ll


कवी : बाळासाहेब तानवडे
दिनांक: २४/१२/२०२१


No comments:

Post a Comment