Sunday, December 24, 2023

स्वाभिमान


सोड रे सोड , कुण्या दये चा स्वार्थ.
जाणून घे आता स्वाभिमानाचा अर्थ.
येऊ दे जाग आता स्वाभिमानाला.
लाभू दे खरा अर्थ स्व जीवनाला.
दयेच्या जीवनास झिडकार तु दूरवर.
वाढव जीवनाचा कर्तृत्वाने उच्च स्तर.
प्रयत्ने दाखव रे आता, तुझ्यातील धमक.
जीवनास येईल बघ वेगळीच चमक.
तळपता ठेव दिवा, अंतरी स्वाभिमानाचा.
प्रकाश मान होईल मार्ग, तुझ्या जीवनाचा.
हांजी हांजी करून , नव्हे रे जीवन.
असं जिन ते , जे की जगून मरण.
स्वाभिमाना विना जीवन, नव्हे ते मरण.
हा महामंत्र नेहमी जीवनी रुजावा छान.
जीवन होईल शंभर नंबरी सोन.
केंव्हा? जर जगशील स्वाभिमानान.
अन मरशील ही स्वाभिमानान.
कवी: बाळासाहेब तानवडे
१ डिसेंबर २०२३

Thursday, February 10, 2022

स्वर-लता


कोकीळ कंठी गायनाची दिव्य अनुभुती तु.
श्रोत्यांची प्राणसखी ,ईश्वराची जणु श्रुती तु.

प्रिती तु,विरहिणी तु, वात्सल्य तु, श्रृंगार तु.
प्रत्येक भाव-भावनेचा उत्कट अविष्कार तु.

सुस्वर अनुभव तु, आनंद तरंग स्वामिनी तु.
फक्त आनंद कसला तो, परमानंद दायिनी तु.

तुझ्या सांगितिक उपकारा तोड नाही अशी तु.
संगीत विश्वा स पडलेल कर्णमधुर स्वप्न शशी तु.

लय तु, ताल तु,सात सुरांची मलिका शुद्ध तु.
सप्तसूर नाहीत वेगळे, तर सप्तसूरच खुद्द तु.

स्वर- सरस्वती,नश्वर जगी या जरी नसशील तु.
मात्र रसिकाच्या मन-मनात सतत गुंजशील तु.

गोड गळ्याच परिमाण तु,अवीट संगीताची राणी तु,
लता, तुझ्या सम तु, फक्त तुझ्या सम तुच आणि तु.

कवी: बाळासाहेब तानवडे
७ फेब्रुवारी २०२२

Friday, January 21, 2022

मंगल अक्षता - (चि.कौस्तुभ आणि चि.सौ. कां. पूजा)


Ilश्रीll
माझा भाचा
चि.कौस्तुभ
आणि
चि.सौ. कां. पूजा
यांच्या शुभ-विवाह प्रित्यर्थ
उथळलेल्या काव्याक्षता.
दिनांक : ०७/०५/२०१७


वंदन करुनी श्री मुखे या.
स्मरण करुया कुलदेवाला.
सनई-चौघडा मंगल धुन,
आज मधुर वाजे छान.
सावधान शुभमंगल सावधान.....


'कौस्तुभ' मणी जणू, लाभे प्रियेला.
'पुजा' जन्माची आली फळाला.
सुभग-सुदिन अजि सोनियाचा.
सकल गाती गुण-गान.
सावधान शुभमंगल सावधान....


'पांडुरंग' हा पिता लाभला.
जनु माउली असे साथीला.
मातृछाया ती आशिष देई.
स्वर्ग लोकी हीचे स्थान.
सावधान शुभमंगल सावधान...


सोनल-ऋचा मायेच्या बहीणी.
सिद्धी, रेयांश, निशाद भाचरे सद्गुनी.
मेहुणे-पाहुणे सोहळा पाहती.
चोहीकडे धुमधाम.
सावधान शुभमंगल सावधान...


मंगल दिन अजि, नव पर्वाचा.
आशिष लाभे सकल जनाचा.
"नांदा सौख्यभरे" कौस्तुभ पूजा,
लाभो सुख, धन-धान.
सावधान शुभमंगल सावधान....


रचना आणि गायन: बाळासाहेब तानवडे


मंगल अक्षता - (चिरंजीव विजय आणि चि. सौ.कां. रुचिरा)





चिरंजीव विजय आणि चि. सौ.कां. रुचिरा यांच्या २६/१२/२०२१ रोजी पुण्यनगरी इथे झालेल्या
मंगल विवाहा प्रीत्यर्थ उधळलेली काव्य सुमनं..

श्री तुझ्या वंदनाने ,शुभकार्ये प्रारंभतो.
अंबे तुझा वरदहस्त ,कायमच स्मरतो.
या मंगल कार्यास, तुम्ही तडीस न्यावे.
तुम्हा चरणी आम्ही ,मागणे हे मागतो.ll१ll


सनई चौघड्याचे, गुंजती मंगलमय सुर.
भारावला तो जन,आला आसमंती नुर.
पुण्य नगरीत,पंचतारांकित या सुस्थळी,
शुभ लग्न समारंभी,आहे मजाच आगळी.ll२ll


श्रीधर-जयश्री ने जणू ,"विजय" हिराच घडवीला.
कर्तृत्वे गायकवाड कुली, त्याने उद्धार केला.
रुचिरा सह आता, विजयी संसार तो रंगेल.
साता समुद्रा पार ,कर्तुत्व बे-लगाम बहरेल.ll३ll


गायकवाड-चौधरी गठबंधन, होइल सुखाचे.
सुखी,आनंदी ,खास समृद्ध ,भावी आयुष्याचे.
आता असेल जीवनी ,आनंद अन् हर्ष उल्हास.
सदा उत्सव च जणू, सभोवार आसमंती खास.ll४ll


रुचिरा सह माता पित्या च्या, नयनात पाणी.
निघाली माहेरा सोडुनी, लाडकी लेक ती गुणी.
क्षणो क्षणी दाटेल नयनी, पाणी दीर्घ विरहाच.
पण समाधानी ते दोहो,पाहून सासर लाख मोलाच.ll५ll


शुभआशीर्वाद द्याया, सारा गणगोत जमला.
उत्साही आनंदे ,साऱ्या कार्यक्रमी तो रंगला.
आता मंगल कार्याचा ,परमोच्च क्षण आला.
मंगल अक्षतांचा, चहूबाजूने वर्षाव तो झाला.ll६ll


विजय-रुचिरा चा ,संपन्न झाला महनमंगल सोहळा.
सुखी आयु च्या नांदीचा, शुभसंकेत आगळा.
"नांदा सौख्यभरे " हाच ,तुम्हा एक आशिष.
दोहोंचा संसारसुखी होऊदे,भरभरून उत्कर्ष.ll७ll


कवी : बाळासाहेब तानवडे
दिनांक: २४/१२/२०२१


Thursday, May 14, 2015

काव्य अक्षता- (चि.सौ.कां. प्रियांका आणि चि. सागर)


माझी पुतणी,
चि.सौ.कां. प्रियांका आणि चि. सागर
यांच्या दिनांक ११ मे २०१५ रोजी संपन्न झालेल्या शुभ विवाहाप्रित्यर्थ उधळलेल्या
काव्य अक्षता
श्री कृपेने हा खेळ सजला.
महादेवा ते वंदन तुजला.
रवळनाथाने दिधले यांना,  समृद्धीचे दान.
सावधान शुभमंगल सावधान २  || १||

आनंदी – लक्ष्मण , आजी – आजोबा.
सुमन – मारुती , आई – बाबा.
भैय्या निलेश ची ही लाडी , बहिण ‘प्रियांका’ छान.
सावधान शुभमंगल सावधान २  || २||

काका – आत्या , मावशी – मामा.
कौतुक करण्या  झाले जमा.
लहान – थोर , पै – पाहुणे , गोतावळा हा महान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ३||

ही लेक लाडकी आई-बापाची.
आज होईल पाहुणी माहेराची.
स्व-जनांचे डोळे झरती, आठवून तिच्या विरहान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ४||

दिन हा मंगलमय जो आला.
आसमंत ही  सुखे गुंजला.
‘सागर’ वरे नवरी ‘प्रियांका’ , सोहळा भव्य महान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ५||

रचना आणि गायन:
श्री. बाळासाहेब तानवडे
०१ मे २०१५


Wednesday, November 6, 2013

अधुरा प्रवास


दिनांक २४/०९/२०१३ रोजी आमची बहीण
 सौ. छाया सुबराव पाटील
यांना देवाज्ञा झाली.
ईश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो.  
 अधुरा प्रवास  
लाडकी तु बहीण माझी मायेची छाया.
सर्वगुणसंपन्न , जणु विधात्याची दया.
लहानशीच मूर्ती तुझी पण active भारी.
वावग न खपणारी,तुझा दरारा घरी–दारी.

मायबाप असूनही बालपणी झाल्या पोरक्या दिशा दाही.
मग आत्या अन आक्काच झाल्या तुझ्या सर्व कांही.
सुख - दुखी राहिला तुझ्या सोबत पांडुरंग खडा.
मग फुलून गेली जीवन बाग,पडला नक्षत्रांचा सडा.

पण यमाची नजर चुकवून वेड वहान त्याच आडव आल.
अन सकलांची याचना न सुनता तुला अवेळी घेऊन गेल.
चोविस दिसांची तुझीही आर्जवे पार मोडकळीस गेली.
अखेर स्वर्गाची हमी देवून तुला पुण्यलोकी नेली.

पाठीसी लावून तुझ्या ग माई आलो मी पाठ.
तुझ्या सवेच गाठायचा होता जीवनाचा काठ.
मात्र टाकून गेलीस आम्हास खूपच दूर - दूर.
देऊन कायमचा दुरावा अन नयनांना महापूर.

तस मिळवलं होतस जवळ-जवळ सर्वच सुख.
पण पाहायचं राहून गेल एकुलत एक सुनमुख.
शेवटी नाही केलस कोणाशीच बोलण-चालण.
अन अचानक झाल तुझ सर्वांस सोडून जाण.

तुला माई अजून खुप जगायचं होत.
कष्ट संपणारच होत,आता सुखात राहायचं होत.
का तुटला असा तुझा अवेळी मधूनच श्वास?
माई ! का राहिला तुझा हा अधुरा प्रवास? 
माई ! का राहिला तुझा हा अधुरा प्रवास? 

कवी : बाळासाहेब तानवडे

२४/०९/२०१३