ना लागे आता सकाळची धूमी.
दिन म्हाई पोर्णिमेचा नक्की झाला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.
देवर्डे ग्रामी सदा तुझा रे वास.
साऱ्यांची तुजवर मर्जी ती खास.
कृपा प्रसाद जन सारे मागती तुला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.
सुगीचे श्रमाचे दिन ते संपले.
त्या घामाचे आता मोती रे झाले.
तुज सर्वानी पुजण्याचा दिन तो आला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.
तुज मंदिरी मोठी यात्रा भरे.
महापूजेचा नाद भरून उरे.
पालखी सोबत हर-हर जयघोष रे झाला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.
आता सगे-सोयरे जमतील भवती.
इष्टमित्रांसह झडतील खास पंगती.
घरी-दारी माणसांचा महासागर रे झाला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.
ग्रामवासियांना तु आता प्रसन्न व्हावे.
आशा –आकांक्षांना साऱ्या पुर्णत्व द्यावे.
थोड उतराई होण्याचा दिन तो आला.
देवा रवळनाथा तुझा उत्सव रे आला.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १०/०२/२०११
No comments:
Post a Comment