Friday, October 19, 2012

मराठी माणसा...

मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला  धंदा तरी   नाही सुयशाची हमी.
आता  द्यायचाय छेद , या समजुतीला. 
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

उच्च  शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय बाळा.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला. 
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता हा  धाडसी  निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

एवढ्यावरच  समाधान तुजला नसावं.
आता   सुंदरशा  स्वप्नांच जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे १९/१०/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.in/

Tuesday, October 9, 2012

मोरा रे मोरा


मोरा रे मोरा , फुलव सुंदर पिसारा.
आले काळे ढग,आला गारगार वारा.

मोरा रे मोरा, आता नाच तर खरा.
आला बघ पाऊस, सवे टपटप गारा.

मोरा रे मोरा, काय बुवा तुझा थाट.
थुईथुई नाचात करशी,सर्वांवर मात.

मोरा रे मोरा, डोईवर डुले राजस तुरा.
सौंदर्याचा मिळाला जणू ताजच तुला.

मोरा रे मोरा, तुझा रुबाब फारच छान.
म्हणूनच तर आहे तुला राजाचा मान.

मोरा रे मोरा,गातोस मियाव मियाव गाणी.
पण नाचताना कारे तुझ्या डोळ्यात पाणी?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे ०९/१०/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.in/

Monday, September 24, 2012

लवंगी मिरची कोल्हापूरची


ती: लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: रंकाळा, टाकाळा,नागाळा,पन्हाळा, 

मला बाई हाय या समद्याची वड. 

गुजरीत जाऊन, साज मला घेऊन, 

फिरवावा लागल त्यो म्हादार रोड||१|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: शाहूपुरी,लक्ष्मीपुरी,राजारामपुरी, 

हाईत साऱ्या पेठत हाटेलं भारी. 

पावन बसाव लागल जवळ खेटून. 

देवुन रश्याची लज्जत न्यारी||२|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

असं रोकून पावणं पाहू नका. 

आता वाईच करा इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. 


ती: औन्दाच संपलय बाई वरीस अठरा. 

ज्वानीला माझ्या वाढलाय खतरा. 

दाजीबा आता वेळ लई दौडू नका. 

काढा आता उद्याचा म्हुतूर पक्का||३|| 


लवंगी मिरची मी कोल्हापूरची. 

नुसतं रोकून पावणं पाहू नका. 

आता कशाला त्यो इचार दाजी. 

म्हन्ते सोसलं हो माझा झटका||धृ|| 


कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. 

औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान

कवी : बाळासाहेब तानवडे 

© बाळासाहेब तानवडे – २५/०९/२०१२
http://kavyarangmere.blogspot.com/


Monday, June 11, 2012

हरवलेली माणुसकी


कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास. 
मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस. 
निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई. 
पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई. 

भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला. 
अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला. 
कधी बळी जाते बिचारी अबला नार. 
तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार. 

संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही. 
भावाची ओळख आता भावास नाही. 
अविचार , स्वार्थाने भिनली जमात. 
माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात. 

नीती मूल्यांचा होई र्‍हासच जणू हा. 
सभोवर जनावरांचा भासच जणू हा. 
प्रकृतीचे हे दुष्ट स्वप्न विरून जावे. 
मनुष्यास माणुसकीचे आता भान यावे. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ११/०६/२०१२ 

http://kavyarangmaze.blogspot.com/

Wednesday, April 25, 2012

Bachelors Party


मित्र वा मैत्रिणीच्या लग्नाचा मुहूर्त पक्का होतो. 

Single Status च्या निरोपाचा सोहळा आगळा ठरतो. 

या celebrationला मुले म्हणती Bachelors Party. 

मुलीच मागे का? त्यांचीही असते Spinster Party. 


नव्या नव्या कल्पना , ठरती नवे नवे plan. 

celebration ला ना मर्यादा ना कशाचे भान. 

उल्हास अन उत्साह जणु फसफसती शाम्पेन. 

फुल्ल टू धमाल, दंगा मस्ती,अन only gain. 


घेराव घालती उत्सव मूर्तीस छेडून करती तंग. 

नाना तऱ्हांनी उडवून खिल्ली मौजेत होती दंग. 

चेष्टा मस्करी गोड गुलाबी हवी हवीशी वाटते. 

मग छुईमुई मन,तयाच सातव आसमान गाठते. 


मोलाच्या अनुभवांचे रात्रभर भडीमार चालतात. 

चांगले जरा कमीच,ज्यादा Dangerच असतात. 

अनुभवांच्या त्या बोलांनी थोड कसनुसं वाटत. 

पण “तो” सिद्धांत आठवून मनास हायस वाटत. 


(सिद्धांत: शादी के लड्डू जो खाए सो पछताए और जो न खाए वो भी पछताए|) 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २५/०४/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.com/

Friday, February 24, 2012

देवा मला लवकर मोठ्ठं कर


रोजच अभ्यास , रोजच शाळा 
रोजच जाण येण येई कंटाळा 
दफ्तराच वजन तु छोटं कर 
देवा मला लवकर मोठ्ठं कर 

अभ्यासा साठी आईची किटकिट
मस्ती बद्दल ती बाबांची मारपीट 
मारकुट्या दादाचा हात घट्ट धर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

News channel बाबांचं लाडकं 
आईला आवडतं serial रडकं 
सर्वानाच cartoonच वेड भर
देवा मला लवकर मोठ्ठं कर 

दुधासवे Complan पितो घटघट
John,सलमान सारख वाढव पटपट
स्वप्नातल्या वचनाचा नको विसर
देवा मला लवकर मोठ्ठं कर

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – २४/०२/२०१२ 

Tuesday, January 3, 2012

का हा दुरावा...("तेरे मेरे बीच में" मराठी Version)


तुझ्या माझ्या प्रेमात ग २ का हा दुरावा कळेना. २ 
मला ही कळेना,तुला ही कळेना २ . 
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. 

तन दोन आपुले ग मन एक आहे २ . 
तुझ्या माझ्या डोळ्यातील स्वप्न एक आहे. 
चूक मी पाहे हो ...शोधून ती पाहे, ती मिळेना२ . 
मला ही कळेना, तुला ही कळेना. 
तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. 

तुजवीण एक क्षण युग भासे मज२ 
तुझिया मनात सखये नसाव दुज 
झालं गेलं विसर ग, झालं गेलं विसर, तू येना. 
मला करमेना , मला साहवेना. 
तुझ्या माझ्या प्रेमात ग कधी हा दुरावा नकोना. 

रचना व गायन : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ०३/०१/२०१२