नमीतो तुज, प्रार्थतो तुज ,तुच आहे दाता अमूचा,
तुज वाचून व्यर्थ आहे ,संसार हा जरी सुखाचा,
नामात तुझ्या सदा असावे, चित्तात रूप तुझे वसावे.
नयानांच्या ज्योतिना आमच्या , तुज पाहण्या तेज गवसावे.
कधी होशी तू राधेचा शाम ,कधी बनसी तू जानकीचा राम.
साथ राहो सदा तुझी , जरी असु आम्ही भाबडे अन आम.
हातांना आराम नसावा ,मनात सद्विचारांचा राहो ठेवा.
अथक प्रयत्नांती द्यावा , गोड यशाचाच मेवा.
जीवनाचा ध्यास, तुच विसावा , जगण्याची आस तुच दिसावा.
जागो जागी, क्षणो क्षणी तुझाच नेहमी वास असावा.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०