विचारांती कुट प्रश्नच राही.
भल्या भल्यांनी दिली ग्वाही.
हाती ना आले विशेष कांही.
मनाचे गूढ कोणा नाही.
जो तो आपल्या परीने शोधू पाही.
पुरा जन्म व्यर्थ जाई.
पण गूढ मात्र कायम राही.
मनाचे गूढ कोणा नाही.
संतांची नजर ताडून पाही.
त्याचेच अस्तित्व चराचरी.
मनी अंशी वसतो हरी.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३०/११/२०१०
मनी अंशी वसतो हरी
ReplyDelete