Wednesday, January 5, 2011

मी कोण? आपण कोण?


न मागताच मिळे नश्वर तन.
न मागताच मिळे जोडीला चंचलस मन.
न कळे आपल्या असण्याचे काय प्रयोजन?
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

तहान-भूक लागे, शरीर अन्न-पाणी मागे.
सारे शरीर निजे पण हृदय,श्वास जागे.
न कळे शरीर व्यवस्था चोख चालवी कोण?
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

आस्तिक सारे देवावर विसंबती.
नास्तिक स्वत:वर भिस्त ठेवती.
वैचारिक मर्यादा न उलंघे कोण.
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

कोण्या अज्ञात शक्तीने भव्य सृष्टी निर्मिली.
अदृश राहून सतत ती इमाने चालवली.
पण या महान कलाकृतीला दाद देणारे कोण?
प्रश्न कांहीसा सुटे , मी कोण? आपण कोण?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे०४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Mi Kon? Apan Kon?)

1 comment:

  1. This is a great qeastion.....


    A simple answer....We are all souls....
    We are creation & God is Nirmata ......

    Foe details visit www.Bramakumaris.com

    ReplyDelete