Saturday, January 8, 2011

जय हनुमंत


जन्मताच धरेवर उडवलीस दाणादाण.
सूर्य महातेज गिळण्या करीशी तु उडान.
पवन पिता लाभे तुज,तु अंजनीसुत.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

तुझ्या शक्तीची साऱ्या जगी रे ख्याती.
बलवान तुज जैसा कोणी ना जगती.
दर्शने होई तुझ्या शनी पीडेचा अंत.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

सीते सोडवण्या तू लंकेशी गेला.
लंका दहणी प्रताप तुझा रावणे दाखवीला.
पराक्रमे होई तुला गदेची साथ.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

लक्ष्मन मूर्च्छित होता उडान तू केले.
संजीवनी बुटी आणण्या तु पर्वता तोलीले.
तुजसम नसे जगती कोणी रामभक्त.
जय देव जय देव महाबली हनुमंत.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे०५/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Jai Hanumant)
 




     

No comments:

Post a Comment