Internet राजा, तु आला, तुला जगाने पाहीले आणि तु जिंकला.
अविरत सेवांचा ओघ देताना ना रे कधी तु थोडासाही थकला.
पदार्पणातच जगास दिलास तु सुसाट e-mail.
वर्षानुवर्षांच्या पत्रास बनवलेस क्षणात snail mail.
Internet राजा, तु रे आहेस फारच फार great.
जगभरच्या आप्त-मित्रांशी भेट घडवशी थेट.
दिल्यास अनंत chat room तु ,सतत चालती गप्पांचे फड.
कुणी संसार सुखास मुकले ,कुणी प्रेमाचे केले सर गड.
तुझ्या आकर्षणाने झाले सारे जगच रे वेडे.
बनवलेस जग सारे एक global खेडे.
Internet राजा, तुझ “दुधारी तलवार” दुज name.
बऱ्या वाईट प्रवृतीशी वागणं तुझ same.
माहिती ,खेळ आणि मनोरंजन सेवा देशी तु मुफ्त.
पण तुझा दुरुपयोग जे करती, तयासी व्हावस आता तु सक्त.
राजा तुझ्या उद्गात्याला,Vinton Grayला कोटी-कोटी धन्यवाद.
ऋणात राहील जग सारे हे मात्र निर्विवाद.
© बाळासाहेब तानवडे – १४/०१/२०११
No comments:
Post a Comment