दही दुधान भरा घागरी.
अन गौळणीनो जाऊ , मथुरेच्या बाजारी ,
लवकर चला,
बाई बिगी बिगी चला,
नाहीतर अडवेल नंदाचा हरी .
गौळणीनो जाऊ, मथुरेच्या बाजारी,
अवघड घाट,
बाई दूर यमुनेचा काठ.
बाई पकडेल कान्हाची स्वारी.
गौळणीनो जाऊ ,मथुरेच्या बाजारी.
आला जवळ फार,
बाई मथुरेचा बाजार.
चला गाठेल हरीची बासरी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या बाजारी ,
मनास माझ्या चैन पडेना .
कुठे पाहू मज दर्श घडेना.
ऐकून माझ्या हाक अंतरीची.
ऐकू दे तान तुझ्या बासरीची.
लवकर चला,
बाई बिगी बिगी चला ,
बाई मारू हरी नामाची ललकारी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या बाजारी.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०
(Mathura Bazar- Gavlan)
(Mathura Bazar- Gavlan)
No comments:
Post a Comment