Thursday, December 30, 2010

नव वर्षा तुझे स्वागत............



धरेची पुन्हा एक सूर्य परिक्रमा पूर्ण झाली.
आता तुझ्या आगमनाची तिथी ती आली.
जुने साल चालले परतीचा सलाम मागत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

नव वर्ष सर्वास लाभो सुखाचे,
मौज मजा अन हर्ष मुखाचे.
तुझ्या आगमना प्रती जागेल जगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

तरुणाईचा जोशीला जल्लोष फुलेल.
अबालवृद्धात उत्साह तो भरून उरेल.
तुझ्या स्वागता नसेल आनंदा अंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

झाले गेले सारे विसरून जाऊ.
नवी आशेची सुख स्वप्ने ती पाहू.
जीवनात येऊ दे अजुन खास रंगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

या वर्षात सारे शुभ शुभ घडावे.
ऐतिहासीक नोंदीत तुझे महत्व वाढावे.
तुझ्या नावाची राहो किर्ती दिगंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.


© बाळासाहेब तानवडे३०/१२/२०१०


http://hindikavitablt.blogspot.com/



प्रतिसादाची प्रतिक्षा
(Happy New Year)

3 comments:

  1. मस्त .... ..आणि नवीन वर्षाभिनंदन!!! ..

    ReplyDelete
  2. खुप धन्यवाद आणि तुम्हालाही नुतन वर्षाच्या शुभेच्छा....

    ReplyDelete
  3. नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete