Sunday, December 5, 2010

शुभमंगल सावधान


सावधान सावधान शुभमंगल सावधान
बाल्य फुलले आनंदाने.
तारुण्य  सजले सुख स्वप्नाने.
राज स्वप्नांच्या पुर्ततेने.
बाल जीवनी आले समाधान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान.

राजस ,तेजस मुख कमलानी.
भाग्य उजळले पाय गुणांनी.
शोभे सौंदर्यवती रानी,
जसी रघु राजाची ती छान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान

जोड़ा अनुरूप या दोघांचा.
संसार होई स्वर्ग सुखाचा.
जीवनाच्या खेळी भाग्याच,
पडे अनुकूल हे दान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान,

दोन्ही घरच्या थोर जनांचा.
आशीर्वाद लाभो नित्य तयांचा.
"नांदा सौख्यभरे" बोलूनी.
उधळती अक्षता त्या महान.
सावधान सावधान शुभमंगल सावधान.

कवी : बाळासाहेब तानवडे

 © बाळासाहेब तानवडे १३/११/२०१०

No comments:

Post a Comment