Sunday, December 5, 2010

मनाच्या असती नानाविध कळा

मन  वाहे  जसा निर्झर  झुळझुळ.
कधी  वाहे जसा ओहोळ  तो खळखळ.
जसा  शिवारी  डोले  चहूकडे  मळा.
मनाच्या  असती  नानाविध  कळा.

याचा  ना  लागे  कुणा  कधीही   ठाव.
जसी  वादळात  हरवे  नाविकाची  नाव.
असती  विविध  सूर  जसे  गाणाऱ्या  गळा.
मनाच्या  असती  नानाविध  कळा.

सुखात  मोहरे  जशी  नवयौवंना वधु.
दुखात  रडे  जशी  झाली  जीवघेणी  काळी  जादू.
नसे  अंत  याच्या सुख - दुखाच्या  खेळा.
मनाच्या  असती  नानाविध  कळा.

मनाचे  काय   सांगावे  बहु  किस्से.
याची  गती  तुल्य  कशासीही  नसे.
जसे  विविध  मत्स्य  विहरती निर्मल  जळा.
मनाच्या  असती  नानाविध  कळा.
कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे३०/११/२०१०

No comments:

Post a Comment