Sunday, December 5, 2010

जीवनसाथी

लाभले  मज  भाग्य  की  ,
लाभलीस  तू  जीवनसाथी .
भरकटलेल्या  जीवन  नौकेचा  ,
धरलास तू  सुकाणू   हाती  .

जीवन  माझे  वादळ  वारा  अन  धरणीचा कंपच  सारा ,
पण तुझ्यामुळे भासला जणू  पश्चिमेचा  सुखद  वारा .
लडखडनाऱ्या  माझ्या  जीवनाचा ,
आहे  फक्त आणि फक्त तूच सहारा .

अनेकदा  मांडला  खेळ  नशिबाचा.
परि ना  लाभले  अनुकूल  दान  मजला.
फिकट  फिकट  रंग   माझ्या  संसाराचा,
तुझ्याच  विविध  कला  गुणांनी  गर्द  सजला.

वेग  वेगळे  सूर  होते  परी,
सुख  दुखाची  गीते  साथ  गाईली.
जणू  संगमाच्या  दोन  नदीनी,
मिळून  स्वप्ने  साथ  पाहीली.

जीवनाच्या  कड्याचे  असू  देत,
नागमोडी  वळण  अन  अवघड  घाट.
तरीही  एकमेकाच्या  साथीने  होईल,
आयुष्याची  रम्य   प्रत्येक   पहाट.

कवी : बाळासाहेब तानवडे

 © बाळासाहेब तानवडे १३/११/२०१०

No comments:

Post a Comment