Sunday, December 5, 2010

जीवन असच असावं !!!

सालं आपल जीवन असच असावं.
खावं,प्यावं अन मस्त जगाव.
कितीही बर – वाईट वागल तरी,
घरातल्यांची कटकट नको , फक्त प्रेमच  असावं.

शाळा – कॉलेजला कधी-कधी जाण असावं.
तिथं खेळ – मनोरंजनातच रमणं असावं.
क्लिस्ठ ,बोरींग अभ्यास आणि परीक्षेवर,
विध्यापीठाच कायमचं रुसणं असावं.

मॉल , मल्टीप्लेक्स , डिस्को मध्ये सतत जाण असावं.
नव-नवीन सुंदर गर्लफ्रेंडच बरोबर येण असावं.
पण पॉकेटमनीच्या कारणाने ,
मंथ एन्डला घरात तुंबळ रण नसावं.

चरितार्थासाठी नोकरी – धंद्याची कटकट साली नसावी.
चारी बाजूंनी फक्त सुख-समृद्धीची बरसात जारी असावी.
  अगदीच काही नाही तरी,
शंभर कोटीच्या लॉटरीची हमी लवकर आणि एकदा तरी असावी.

कवी : बाळासाहेब तानवडे

 © बाळासाहेब तानवडे ११/११/२०१०

No comments:

Post a Comment