पायी वाजे पैंजण.
छुम छुम छननन.
करण्या नर्तन भरल्या दरबारा.
बाई मी इंद्राची अप्सरा.
रूप माझ बावनकशी.
जणू पसरल्या पाचूच्या राशी.
चौफेर वाहे रूपाचा वारा.
बाई मी इंद्राची अप्सरा.
रंभा , उर्वशी , मेनका.
त्यांचे इशारे पाहू नका.
माझाच नखरा खरा.
बाई मी इंद्राची अप्सरा.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ३०/११/२०१०
No comments:
Post a Comment