Sunday, December 5, 2010

रत्न

रत्न
राजाची  अन  राणीची ,
गोष्ट  आहे  नवरत्नांची.
एकजुटीच्या  प्रयत्नांची ,
विलग  होऊन  सलग  होण्याची.

राजाचा    आणि   राणीचा,
संसार  होता  काबाड  कष्टाचा .
सच्चाईच्या  वागण्याचा ,
म्हणून  होता  समाधानाचा.

अथक  कष्टाचे  चीज  झाले.
अंकुरून नासिबाचे  बीज  आले.
नवसा सायासाने  ना  कुणा  मिळे.
तो  नवरत्नांचा  हार  यांना  फळे.

नव  रत्ने  सारी  सुरेख  होती ,
प्रत्येकाची  अलग  चमक  होती.
पण  एकाच  तेज  भारी  होत,
जणू  सर्वांच  राज  कारभारी  होत.

सर्वांची  त्यावर  माया  होती.
त्याची  सर्वावर  गर्द  छाया  होती.
पण  अचानक  गहजब  झाले.
ते  रत्नच  हरातून  अलग  झाले.

आकांड  - तांडव  गोंधळ  झाले.
एकजुटीचे  तुकडे  पडले.
निराशेचे  ढग  साचले.
दुःखाचे  डोंगर  मग  रचले.

प्रयत्नांची  शर्थ  झाली.
बोलणी  सारी  व्यर्थ  झाली.
अखेर  जागा  त्याची  रिती  राहिली.
पण  याद  मात्र  जिती  राहिली.

राणीने  तर  श्वास  सोडला.
राजाचाही  श्वास  कोंडला.
रत्नांचा उल्हास सांडला.
नात्यावरचा विश्वास उडाला.

पण  अचानक  वारे  फिरले.
फिरून  ते  रत्न  माळेत शिरले.
वियोगाचे  दिन  आता  सरले.
प्रत्येक  मन  आनंदाने  भरले.

कवी : बाळासाहेब तानवडे
 © बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०
(Ratn)

No comments:

Post a Comment